आपल्याच पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीच्या पथकाने ओढत नेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:42 IST2025-02-28T15:42:04+5:302025-02-28T15:42:51+5:30
पोलीस निरीक्षकाला ओढत नेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

आपल्याच पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीच्या पथकाने ओढत नेले
UP Police Bribe : सर्व सरकारी विभाग, खासकरुन पोलीस विभागावर लाचखोरीचा सातत्याने आरोप केला जातो. सर्वच पोलीस अधिकारी लाचखोर नसतात, पण काहीजण लाच घेतात. यातील काही पकडलेही जातात. सध्या अशाच एका लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात त्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी ओढत घेऊन जाताना दिसतात.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील असून, यात लाचलुचपत विभागाने पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेत हात पकडले आहे. पकडल्यानंतर आरोपी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकासोबत जायला तयार नव्हते. अशा स्थितीत त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आले. या घटनेचा मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
मिर्जापुर: चील्ह थाने के थाना प्रभारी दुष्कर्म पीड़िता से FIR दर्ज करने के नाम पर 30 हजार रुपए की रिश्वत लेते अपने ही थाने से पकड़े गए.
— Siddharth Purohit (@sidpvishnu) February 28, 2025
क्या सिर्फ सस्पेंड होना काफी होगा इतने संवेदनशील मामले में?#Mirzapur#UPNewspic.twitter.com/R99z1g4WTu
व्हिडिओमध्ये लाचखोर पोलीस अधिकारी जोरजोरात ओरडताना अन् लाचलुचपतच्या तावडीतून सुटण्याचाही प्रयत्न करताना दिसतोय. पण, लाचलुचपतचे पथक बळजबरीने त्या पोलीस अधिकाऱ्याला जीपमध्ये बसवतात. हे प्रकरण मिर्झापूरच्या चिलाह पोलीस ठाण्याचे असून, एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव शिवशंकर सिंग आहे.
शिवशंकर सिंह यांनी पीडित मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांकडून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. एवढी रक्कम देण्यास पीडित मुलीच्या मामाने असमर्थता व्यक्त केल्यावर 30 हजार रुपयांत प्रकरण मिटवण्याचे ठरले. यानंतर पीडितेच्या मामाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची चौकशी करत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी दुपारी चिलाह पोलिस ठाण्याजवळ शिवशंकर यांना पैसे घेताना रंगेहात पकडले.