गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कपडे काढून आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी या कार्यकर्त्यांना धक्काबुक्कीही केली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने धक्कादायक माहिती दिली आहे. हे आंदोलन देशाला बदनाम करण्यासाठी नियोजनबद्धरीतीने करण्यात आले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच या आंदोलनाचे धागेदोरे अनेक राज्यांपर्यंत पसरलेले आहेत, त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास क्राईम ब्रँचची इंटर स्टेट सेल करणार आहे.
या प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये युवक काँग्रेचे अध्यक्ष उदय भानू चिब यांचाही समावेश आहे. त्यांची ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात टिळक मार्ग पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. यामध्ये नंतर १९१ (१) आणि १९२ ही दोन आणखी कलमे जोडण्यात आली.
याबाबत स्पेशल सीपी (क्राईम ब्रँच) देवेंद्र चंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये अनेक जणांचा सहभाग होता, ही बाब प्राथमिक तपासामधून समोर आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाण आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमधून अनेक संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे. याशिवाय आणखीनही काही लोकांची ओळख पटवण्यात आली आहे.
Web Summary : Delhi police claim the AI summit protest was planned to defame India, with links across states. Eight arrested, including Youth Congress president Uday Bhanu Chib. Crime Branch's Interstate Cell will investigate further, examining CCTV footage to identify more suspects.
Web Summary : दिल्ली पुलिस का दावा है कि एआई समिट का विरोध भारत को बदनाम करने के लिए योजनाबद्ध था, जिसके संबंध कई राज्यों में हैं। युवक कांग्रेस अध्यक्ष उदय भानू चिब सहित आठ गिरफ्तार। क्राइम ब्रांच की अंतरराज्यीय सेल आगे जांच करेगी, सीसीटीवी फुटेज की जांच कर और संदिग्धों की पहचान करेगी।