NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 15:27 IST2025-09-17T15:26:12+5:302025-09-17T15:27:36+5:30
Uttar Pradesh Crime News: NEET परीक्षेची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थ्याची गोतस्करांनी हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. तसेच या घटनेविरोधात लोकांकडून तीव्र आंदोलनही होत होतं. दरम्यान, या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची माहिती गोरखपूरमधून समोर आली आहे.

NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
NEET परीक्षेची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थ्याची गोतस्करांनी हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. तसेच या घटनेविरोधात लोकांकडून तीव्र आंदोलनही होत होतं. दरम्यान, या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची माहिती गोरखपूरमधून समोर आली आहे. एन्काऊंटर करण्यात आलेल्या आरोपीचं नाव रहीम असं असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
गोरखपूरचे एसएसपी राजकरण नैय्यर यांनी सांगितले की, या घटनेतील आरोपींपैकी एक असलेल्या अजब हुसेन याला ग्रामस्थांनी पकडले होते. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून, तो रुग्णालयात उपचार घेत आहे. याशिवाय आणखी एक आरोपी असलेल्या रहीम याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. दरम्यान, या रहीमला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली आहे.
रहीम याने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळ्या झाडत प्रत्युत्तर दिले. त्यापैकी एक गोळी लागून तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याशिवाय छोटू आणि राजू या इतर दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच पुढील कारवाई केला जात आहे.