शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्षाच्या घरावर दरोडाप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST

तलवारीचा धाक दाखवून ४० तोळे दागिन्यांसह ९ लाखांची केली होती लूट : लुटीतील ५ तोळे सोने जप्त

तलवारीचा धाक दाखवून ४० तोळे दागिन्यांसह ९ लाखांची केली होती लूट : लुटीतील ५ तोळे सोने जप्त

सासवड : सासवडचे माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका नीलिमा चौखंडे यांच्या चौखंडे आळी येथील बंगल्यावर दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून तब्बल ४० तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ९ ते १० लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. तीन महिन्यांनंतर या दरोड्याचा शोध लावण्यात गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना १९ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती सासवडचे पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांनी दिली.
विशाल ऊर्फ बंजारा शरद पवार (वय २२, रा. काळे शिवार, शितोळे वस्ती, शिंदवणे, ता. हवेली) या प्रमुख दरोडेखोरास अटक केल्यानंतर सासवडच्या दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकृष्ण इनामदार यांनी त्यास १४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत अजय वसंत शिंदे (वय ४०) आणि देवानंद वसंत शिंदे (वय ३०, दोघेही रा. शिंदवणे, ता. हवेली) या दरोडेखोरांना २ मे रोजी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत दरोडेखोरांनी आणखी तीन आरोपींची नावे सांगितली आहेत.
अण्णा वसंत शिंदे, (रा. पांचाळमळा, शिंदवणे), तिवार शरद पवार (रा. शिंदवणे ता. हवेली) आणि किशोर मक्कन पवार (रा. मुंबई वस्ती, पोंढे, ता. पुरंदर) अशी आरोपींची नावे असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आणखी मुद्देमाल ताब्यात घेण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली असता, सर्व आरोपींना दि. १९ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रमुख दरोडेखोर बंजारा शरद पवार याचा सासवडमधील मागच्या वर्षी झालेल्या एका घरफोडीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या गुन्‘ात अटक केलेले व नावे निष्पन्न झालेले बहुतेक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. तिवार शरद पवार हा प्रमुख दरोडेखोर बंजारा पवार याचा सख्खा भाऊ आहे. तर अण्णा मक्कन पवार हा बंजाराचा सासरा आहे. तसेच अजय शिंदे आणि देवानंद शिंदे हे दोघे भाऊ आहे. आरोपीने चौखंडे यांच्यासह लोणी काळभोर, सोरतापवाडी या परिसरात गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. सासवड येथील तालुका न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर झालेल्या ओळख परेडमध्ये चौखंडे कुटुंबीयांनी त्यास ओळखले आहे. त्याचबरोबर दरोड्यातील दागिने २ सोनारांना विकल्याचे कबूल केले आहे.