लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 19:04 IST2025-05-10T19:03:30+5:302025-05-10T19:04:41+5:30

भारतीय लष्कराशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी २२ वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Police arrest youth after video of army movement posted on social media | लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक

लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक

पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे सीमा भागात लष्कराच्या हालचाली वाढल्या होत्या. लष्कराच्या हालचालीसंदर्भात कोणतीही माहिती, फोटो अथवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. एका तरुणाला सोशल मीडियावर लष्कराच्या हालचालीसंदर्भातील व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारत पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष वाढल्यानंतर पोलीस आणि सायबर सेलकडून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या मजकूर, फोटो आणि व्हिडीओवर नजर ठेवली जात होती. केंद्र सरकारने लष्कराच्या हालचालीशी संबंधित कोणत्याही प्रकारचे फोटो वा व्हिडीओ शेअर करण्यावर बंदी घातली होती. याच प्रकरणात तरुणाला अटक करण्यात आली आहे. 

अटक झालेला तरुण कोण?

राजस्थानाताली बाडमेर जिल्ह्यात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. जियाराम तुलसाराम मेघवाल (वय २२, रा.पुनिया, तालुका गिडाहाल) असे या तरुणाचे नाव आहे. 

जियारामने भारतीय लष्कराच्या हालचालीसंदर्भातील संवेदनशील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. याची गंभीर दखल घेतल डीएटी आणि डीसीआरबीच्या पोलीस पथकांनी त्याच्या कारवाई केली. त्याच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यातील कलम १७० नुसार अटकेची कारवाई करण्यात आली. 

Web Title: Police arrest youth after video of army movement posted on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.