शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

गर्लफ्रेंड्सचे लाड पुरवण्यासाठी गाड्यांची चोरी करणारा सुपरचोर अटक, पोलिसांना चकवा देण्यासाठी प्लास्टिक सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 12:48 PM

एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीमधून त्याला अटक केली आहे.

ठळक मुद्देएक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोर कुणालला दिल्ली पोलिसांनी अटक केलीपोलिसांना चकवा देण्यासाठी कुणालने प्लास्टिट सर्जरी केली होतीकुणालसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे

नवी दिल्ली - एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीमधून त्याला अटक केली आहे. कुणाल असं या सुपरचोराचं नाव असून गेल्या 20 वर्षात एक हजाराहून जास्त चो-या त्याने केल्या आहेत.

पोलीस उपायुक्त रोमिल बानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा रहिवासी असणा-या कुणालला दक्षिण दिल्लीमधील नेहरु प्लेस येथून अटक करण्यात आली. 13 ऑक्टोबर रोजी ही अटकेची कारवाई करण्यात आली. कुणालसोबत त्याच्या दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. 

दिल्ली आणि जवळच्या परिसरामधील 62 कारचोरीच्या घटनांमध्ये कुणालचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 'आपला आणि आपल्या गर्लफ्रेंड्सचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला होता', असं पोलिसांनी सांगितलं आहे. कुणालला अटक केल्यानंतर चौकशी केली असता, इरशाद अली आणि मोहम्मद शादाब यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली. इरशाद अली आणि मोहम्मद शादाब चोरी झालेल्या कार विकत घेत असत. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. 

आपली ओळख बदलण्यासाठी आणि अटक टाळण्याच्या हेतूने कुणालने चार वर्षांपुर्वी प्लास्टिक सर्जरी करुन घेतली होती अशी माहिती पोलीस उपायुक्त रोमिल बानिया यांनी दिली आहे. पोलिसांनी चोरी झालेल्या 12 कार जप्त केल्या आहेत.

एकाच वेळी अनेक गर्लफ्रेंड्सचे लाड पुरवण्यासाठी कुणालने चोरी करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्याने चोरी करायला सुरुवात केली. फेब्रुवारी 2017 मध्ये तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सात महिन्यांतच त्याने दिल्लीतून शंभरपेक्षा जास्त कार चोरल्या आहेत. कुणालला याआधीही अनेकदा अटक झाली आहे. एकदा पोलीस कोठडीतून पळून जाण्यातही तो यशस्वी ठरला होता. अखेर कुणालसह दोन साथीदारांना जेरबंद करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत. 

टॅग्स :ThiefचोरNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिसCrimeगुन्हा