Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 11:26 IST2025-10-14T11:25:51+5:302025-10-14T11:26:34+5:30
Cough Syrup : मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे.

Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील एका डॉक्टरला हे कफ सिरप लिहून दिल्याबद्दल १०% कमिशन मिळत होतं. कफ सिरपमुळे आतापर्यंत २३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रवीण सोनी यांना श्रीसन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्सकडून १०% कमिशन मिळत होतं. या कमिशनमुळेच त्यांनी कोल्ड्रिफ सिरप लिहून देणं सुरू ठेवलं. सोमवारी तामिळनाडू सरकारने श्रीसन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर्सचा प्लांट बंद केला आणि त्याचा परवाना रद्द केला तेव्हा हा खुलासा झाला. याच दरम्यान ईडीने कंपनीच्या अनेक ठिकाणी छापे टाकले.
कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; चेन्नईतील श्रीसन फार्माच्या ७ ठिकाणी छापे
या प्रकरणाची सुनावणी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश गौतम कुमार गुर्जर यांनी डॉ. सोनी यांचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने म्हटलं आहे की, डॉक्टरांना संभाव्य धोक्यांची जाणीव असूनही त्यांनी जाणूनबुजून कफ सिरप लिहून दिलं होतं.
"पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
न्यायालयात सादर केलेल्या पोलीस अहवालात १८ डिसेंबर २०२३ च्या सरकारी निर्देशाचाही उल्लेख आहे. त्या निर्देशात, भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना स्पष्टपणे आदेश दिले होते की, त्यांनी चार वर्षांखालील मुलांना फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधं लिहून देऊ नयेत. तरीही डॉ. सोनी तेच सिरप लिहून देत राहिले.
"ते औषध नव्हतं, विष होतं, मी स्वत: माझ्या मुलाला..."; लेकाच्या मृत्यूनंतर आईचा टाहो
पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
पोलीस तपासात सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा होता की, डॉ. सोनी कंपनीकडून १०% कमिशन घेत होते. डॉ. सोनी यांनी न्यायालयात हे आरोप फेटाळून लावले. त्यांचे वकील पवन कुमार शुक्ला यांनी सांगितलं की, डॉ. प्रवीण सोनी हे एक सरकारी डॉक्टर आहेत आणि उपचारादरम्यान त्यांनी लिहून दिलेली औषधं त्यावेळच्या परिस्थितीसाठी योग्य होती.