PM Swamitva Yojna :केंद्र सरकार भारतातील शहरांसह ग्रामीण भागाच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार ग्रामीण भागासाठी अनेक योजनाही राबवत आहे. ग्रामस्थांसाठी केंद्रीय योजनांपैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान स्वामी योजना आहे. ग्रामीण भाग आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करणे, हा या योजनेमागील केंद्र सरकारचा उद्देश आहे.
या योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (18 जानेवारी 2025) दुपारी 12:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 230 हून अधिक जिल्ह्यांतील 50,000 हून अधिक गावांमधील 65 लाखांपेक्षा जास्त मालमत्ताधारकांना मालमत्ता कार्ड वितरित करणार आहेत.
पहिल्या टप्प्यात या राज्यांमध्ये सुरुवात
ग्रामीण भागात असे अनेक लोक राहतात, ज्यांच्यांकडे त्यांच्या जमिनीचे व घरांचे मालकी हक्क आणि सरकारी कागदपत्रे नाहीत. या लोकांसाठी पीएम स्वामीत्व योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. ही योजना पंतप्रधान मोदींनी एप्रिल 2020 मध्ये सुरू केली होती, जी पहिल्या टप्प्यात हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशमधील गावांमध्ये लागू करण्यात आली होती.
बँकेचे कर्ज, वाद इत्यादी गोष्टींमध्ये फायदा होणारया योजनेमुळे लोक केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार नाहीत, तर ते स्वावलंबीही होतील. या अंतर्गत लोकांना केवळ मालकी हक्क मिळणार नाही, तर लोकांना बँकेतून लोव मिळणे अधिक सोपे होईल. मालमत्तेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यातही मदत होईल. कोणीही आपली मालमत्ता कोणालाही सहज विकू शकेल. या योजनेअंतर्गत ड्रोनच्या सहाय्याने गावे आणि शेतजमिनीचे मॅपिंग केले जाणार आहे.