शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

PM मोदींचा दौरा 4 तासांचा अन् MP सरकार खर्च करणार 23 कोटी! बघा काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 12:39 PM

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 5000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत....

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा आदिवासी परिषदेत सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे येत आहेत. पीएम मोदी भोपाळमध्ये चार तास थांबतील. यावेळी जंबूरी मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात ते  1 तास 15 मिनिटे मंचावर असतील. या कार्यक्रमांसाठी राज्य सरकार तब्बल 23 कोटी रुपये खर्च करणार आहे.

योथे लोकांना बसण्यासाठी मोठ-मोठे मंडप टाकण्यात आले आहेत. त्यात पडदेही लावले जात आहेत. गेल्या आठवडाभरापासून तीनशेहून अधिक कामगार या कामात गुंतले आहेत. या कार्यक्रमासाठी राज्य सरकार 16 कोटी रुपये खर्च करत असून त्यापैकी 13 कोटी रुपये फक्त जंबूरी  मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात खर्च होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय काही प्रमुख नेतेच मंचावर असणार आहेत.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत 30 वरिष्ठ अधिकारी, 5000 हून अधिक पोलिस तैनात - पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 5000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भोपाळ पोलिसांनी हॉटेलमध्ये थांबवलेल्या बाहेरील लोकांची माहितीही गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर एक टीम तयार करून भाडेकरूंचे व्हेरिफिकेशनही केली जात आहे. आठ दिवसांत पोलिसांना 6 हजारांहून अधिक भाडेकरू शोधले आहेत.

पंतप्रधान देशातील पहिल्या पीपीपी मॉडेलवर आधारलेल्या रेल्वे स्थानकाचे करतील उद्घाटन - या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. बाहेरूनही पोलीस राहील, कडक बंदोबस्त असेल. एसपीजीचेही लक्ष आहे. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणीही करतील. यावेळी पंतप्रधान देशातील पहिल्या पीपीपी मॉडेलवर आधारलेल्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील. या रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी जर्मनीच्या हेडलबर्ग रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हबीबगंज रेल्वे स्थानकात मध्यप्रदेशचे पर्यटन तथा दर्शनीय स्थळे, जसे भोजपूर मंदिर, सांची स्तूप, भीमबैठिका, यांचे चित्र प्रदर्शित केले जातील. मुख्य दरवाजाच्या आत दोन्ही बाजूंच्या भिंतीवर भिल्ल, पिथोरा पेंटिंगही असेल. वेटिंग रूम आणि लाउंज एअर कॉन्कोर्स जे 84 मीटर लांब आणि 36 मीटर रुंद असेल. प्लॅटफॉर्मवर 1750 प्रवाशांसाठी स्टेनलेस स्टिलची सिटिंग व्यवस्थाही करण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा