Prahlad Modi : पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींच्या कारचा भीषण अपघात; मुलगा, सून गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 17:09 IST2022-12-27T17:01:35+5:302022-12-27T17:09:32+5:30
Prahlad Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला आहे.

Prahlad Modi : पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींच्या कारचा भीषण अपघात; मुलगा, सून गंभीर जखमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे भाऊ प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला आहे. ही घटना कर्नाटकातील म्हैसूरमध्ये घडली आहे. अपघाताच्या वेळी त्यांच्यासोबत कारमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि सूनही होते. या अपघातात त्यांचा मुलगा आणि सून गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात झाला तेव्हा ते कारने म्हैसूर (कर्नाटक) जवळील बांदीपुरा येथे जात होते. कडकोला येथे त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.