शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

PM मोदींच्या सभेत काळे कपडे घालून येणाऱ्यांना 'नो एंट्री'; प्रशासनानं उतरवली RSS कार्यकर्त्याची टोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 2:25 PM

आज, वाराणसीतील काशी हिंदू विश्वपीठाच्या आयआयटी खेळाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. पंतप्रधान मोदींना कुणीही विरोध करू नये, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली होती.

वाराणसी- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी दौऱ्याच्या (Varanasi Visit) पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला होता. पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी बीएचयूच्या आयआयटी मैदानावर पोहोचणाऱ्या लोकांना काळे कपडे (Black Cloths) घालूण येण्याची परवानगी नव्हती. एवढेच नाही, तर यावेळी लोकांचा काळ शर्ट आणि आरएसएसच्या (RSS) स्वयंसेवकांची काळी टोपीही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी उतरवली. (PM Narendra Modi Varanasi Visit bhu iit ground no entry to black clothed people RSS worker took off his cap)

आज, वाराणसीतील काशी हिंदू विश्वपीठाच्या आयआयटी खेळाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. पंतप्रधान मोदींना कुणीही विरोध करू नये, यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली होती. यावेळी, काळे शर्ट अथवा टी-शर्ट घालून येणाऱ्यांचे कपडे काढण्यात आले अथवा त्यांना आत सोडण्यात आले नाही. विशेष म्हणजे काळे मास्कदेखील यावेळी काढायला सांगण्यात आले.

आता उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य, जबरदस्त काम करतायत मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींकडून योगींचं कौतुक

RSS कार्यकर्त्यालाही काढायला सांगितली टोपी -मोदींच्या सभेसाठी आरएसएसचा एक कार्यकर्ता यूनिफॉर्म आणि काळी टोपी घालून पोहोचला होता. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यालाही टोपी काढायला सांगितली. यानंतरच त्याला सभेच्या ठिकाणी जाण्याची परवानगी देण्यात आली. काही लोकांना हे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य वाटले. तर काहींना हे अयोग्य वाटले.

 21 आयपीएस आणि 10 हजार जवान सुरक्षेत तैनात - पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी एनएसजीचे कमांडो आणि एटीएसच्या कमांडोज शिवाय केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांची टीमही आहे. तसेच बाहेर सुरक्षेसाठी सेंट्रल पॅरामिलिट्री फोर्सचे जवानही तैनात आहेत. या व्यवस्थेची जबाबदारी  21 आयपीएस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. ज्यांच्यासोबत 10 हजारहून अधिक पोलीस आणि पीएसीचे जवान जागो-जागी तैनात आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणीही टॉप फोर्स तैनात करण्यात आला आहे. तसेच ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी जाणार आहेत, त्या-त्या ठिकाणी नो फ्लाइंग झोनही तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसी