शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

तांब्यात गरम कोळसा टाकून कपडे प्रेस करायचो, मोदींची 'राज'की बात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 07:44 IST

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक मुलाखत घेतली आहे.

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा टीझरही अक्षयनं ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मोदींबरोबर विनोद आणि मस्करी करताना पाहायला मिळतोय. या टीझरमध्ये मोदींनीही एका किस्सा ऐकवला आहे. ज्यात ते म्हणतात, तांब्यात गरम कोळसा टाकून कपडे प्रेस करायचो. तसेच मोदींनी यावेळी कपड्यांच्या फॅशनसंदर्भातही अक्षय कुमारबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. व्यवस्थित राहणं ही माझी प्रकृती आहे. गरिबी असल्यामुळे लोकांमध्ये वावरताना स्वतःला कमी समजत होतो.आमच्या घरात इस्त्री नव्हतीच म्हणूनच मग कपड्यांना प्रेस करण्यासाठी तांब्यामध्ये कोळसा टाकायचो. ते कपडे परिधान करून मगच बाहेर जात होतो. यावेळी मोदींच्या निद्रेसंदर्भातही अक्षयनं प्रश्न विचारला. तुम्ही 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच. त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण ते माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले, की माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मी त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं.तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे. अक्षय कुमारनं गेल्या काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्यावेळी तो काही तरी विशेष करणार असल्याची तेच्या चाहत्यांना कल्पना आली होती. तो राजकारणात प्रवेश करेल, असंही म्हटलं जात होतं.परंतु दुसरं ट्विट करत त्यानं राजकारणात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अक्षयनं मोदींची घेतलेली ही पूर्ण मुलाखत सकाळी 9 वाजता एएनआय ही वृत्तसंस्था प्रसिद्ध करणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019Akshay Kumarअक्षय कुमार