pm narendra modi unknown facts revealed in akshay kumar interview | तांब्यात गरम कोळसा टाकून कपडे प्रेस करायचो, मोदींची 'राज'की बात 
तांब्यात गरम कोळसा टाकून कपडे प्रेस करायचो, मोदींची 'राज'की बात 

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा टीझरही अक्षयनं ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मोदींबरोबर विनोद आणि मस्करी करताना पाहायला मिळतोय. या टीझरमध्ये मोदींनीही एका किस्सा ऐकवला आहे. ज्यात ते म्हणतात, तांब्यात गरम कोळसा टाकून कपडे प्रेस करायचो. तसेच मोदींनी यावेळी कपड्यांच्या फॅशनसंदर्भातही अक्षय कुमारबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. व्यवस्थित राहणं ही माझी प्रकृती आहे. गरिबी असल्यामुळे लोकांमध्ये वावरताना स्वतःला कमी समजत होतो.

आमच्या घरात इस्त्री नव्हतीच म्हणूनच मग कपड्यांना प्रेस करण्यासाठी तांब्यामध्ये कोळसा टाकायचो. ते कपडे परिधान करून मगच बाहेर जात होतो. यावेळी मोदींच्या निद्रेसंदर्भातही अक्षयनं प्रश्न विचारला. तुम्ही 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच. त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण ते माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले, की माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मी त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं.


तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे. अक्षय कुमारनं गेल्या काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं. त्यावेळी तो काही तरी विशेष करणार असल्याची तेच्या चाहत्यांना कल्पना आली होती. तो राजकारणात प्रवेश करेल, असंही म्हटलं जात होतं.
परंतु दुसरं ट्विट करत त्यानं राजकारणात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. अक्षयनं मोदींची घेतलेली ही पूर्ण मुलाखत सकाळी 9 वाजता एएनआय ही वृत्तसंस्था प्रसिद्ध करणार आहे. 


Web Title: pm narendra modi unknown facts revealed in akshay kumar interview
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.