शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

PM Modi security: PM नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, आंध्र प्रदेशात काँग्रेसकडून काळे फुगे दाखवत विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 17:45 IST

PM Narendra Modi Security Breach: आंध्र प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ काँग्रेसकडून काळे फुगे हवेत सोडण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

विजयवाडा: आंध्र प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक (PM Narendra Modi Security  Breach) झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ येऊन काँग्रेसकडून काळे फुगे हवेत सोडण्यात आले. ही घटना विजयवाडामध्ये घडली असून, या घटनेचा एक व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

भाजपला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून हे काळे फुडे सोडण्यात आल्याचे बोलले जात आहे. मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फुगे हवेत सोडले. विशेष म्हणजे, काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरजवळ येणार, याबाबत सुरक्षा अधिकाऱ्यांनाही काही माहिती नव्हती. अधिकाऱ्यांकडून याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून जेव्हा पीएम मोदींचे हेलिकॉप्टर उड्डाण घेणार होते, तेव्हाच हे फुगे सोडले जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणावर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडूनही कोणतीही माहिती आली नाही.

यापूर्वीही झाली मोठी चूकयाआधी पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान पीएम मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक झाली होती. पठाणकोटमध्ये रॅलीसाठी जात असताना शेतकरी आंदोलनाशी संबंधित आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला होता. आंदोलकांनी रस्त्यात मोदींचा ताफा अडवल्यामुळे जवळपास 30 मिनीटे मोदी रस्त्यावर अडकून पडले होते. या मुद्द्यावर केंद्र सरकारने पंजाब सरकारकडून उत्तरही मागवले होते. नंतर पंजाबच्या तत्कालीन काँग्रेस सरकारने याबाबत खंत व्यक्त केली होती. यावरुन देशभरात मोठा गदारोळ झाला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीhyderabad-pcहैदराबादAndhra Pradeshआंध्र प्रदेशTelanganaतेलंगणाcongressकाँग्रेसBJPभाजपा