शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

मोदींनी नाकारली काँग्रेसची खास भेट; पंतप्रधानांनी न स्वीकारल्यानं पॅकेज रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 3:10 PM

मोदींना ऑर्डर परत पाठवली; ट्विट करून काँग्रेसचा दावा

काँग्रेस: प्रजासत्ताक दिनानिमित्तकाँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष भेट पाठवली होती. मात्र पंतप्रधानांनी भेट स्वीकारली नसल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. या संदर्भातला एक स्क्रीनशॉट काँग्रेसनं ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केला आहे. काँग्रेसनं अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून मोदींना संविधानाची प्रत पाठवली होती. देशाचं विभाजन करण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाल्यावर कृपया संविधान वाचा, असा संदेश काँग्रेसनं मोदींना संविधानाची प्रत पाठवताना दिला होता.  प्रिय पंतप्रधान, संविधानाची प्रत थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल. देशाची विभागणी करण्याच्या कामातून वेळ मिळाल्यावर आपलं संविधान नक्की वाचा, असं आवाहन करणारं ट्विट काँग्रेसनं कालच केलं होतं. ​​​​​​​अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून काँग्रेसनं मोदींना संविधानाची प्रत पाठवली होती. ती काल मोदींकडे पोहोचणार होती. याची माहिती देणारा ​​​​​​​अ‍ॅमेझॉनचा स्क्रीनशॉटदेखील काँग्रेसनं शेअर केला होता.  आज दुपारी काँग्रेसनं ट्विट करत मोदींनी संविधानाची प्रत नाकारल्याची माहिती दिली. 'प्रिय देशवासीयांनो, आम्ही प्रयत्न केला. मात्र मोदींना संविधानात रस नाही. आता करायचं तरी काय?', असा सवाल काँग्रेसनं ट्विटमधून उपस्थित केला. या ट्विटसोबतदेखील काँग्रेसनं एक स्क्रीनशॉट शेअर केला. 'तुम्ही पाठवलेलं पॅकेज डिलेव्हरीच्या पत्त्यावर स्वीकारण्यात न आल्यानं किंवा ऑर्डर रद्द करण्यात आल्यानं विक्रेत्याकडे परत जात आहे,' असा मजकूर या स्क्रीनशॉटमध्ये आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRepublic Dayप्रजासत्ताक दिनcongressकाँग्रेस