'२४ वर्षे एकही सुट्टी नाही...' PM मोदींच्या ऐतिहासिक कामगिरीवर अमित शाहांकडून गौरोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 19:18 IST2026-03-22T19:17:25+5:302026-03-22T19:18:20+5:30

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते झाले आहेत.

PM Narendra Modi: 'No holiday for 24 years' Amit Shah praises PM Modi's historic achievements | '२४ वर्षे एकही सुट्टी नाही...' PM मोदींच्या ऐतिहासिक कामगिरीवर अमित शाहांकडून गौरोद्गार

'२४ वर्षे एकही सुट्टी नाही...' PM मोदींच्या ऐतिहासिक कामगिरीवर अमित शाहांकडून गौरोद्गार

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८,९३१ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशातील सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा ८,९३० दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे  कौतुक केले.

गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी म्हटले की, पीएम मोदी यांच्या दशकांतील सेवेमुळे देशात विकास, जनकल्याण आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. गरीबांना हक्क मिळवून देणे, विकासाचे नवे विक्रम निर्माण करणे आणि जागतिक मंचावर भारताचा सन्मान वाढवणे यामुळे देशात मोठा बदल झाला आहे.

शाह पुढे म्हणतात, पंतप्रधान मोदींनी २४ वर्षांहून अधिक काळ एकही सुट्टी न घेता देशसेवा केली, हे त्यांच्या समर्पणाचे मोठे उदाहरण आहे. त्यामुळेच त्यांना देशातील जनतेचे मोठे प्रेम आणि समर्थन मिळाले आहे.

मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा प्रवास

नरेंद्र मोदी तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी २०१४, २०१९ आणि २०२४ या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पक्षाला विजय मिळवून दिला. गुजरातचे मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून त्यांनी एकूण ८,९३१ दिवस पदावर राहून देशातील सर्वाधिक काळ शासन करणारे नेते म्हणून विक्रम केला आहे.

सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता

मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनलवर ३ कोटी सबस्क्राइबर पूर्ण झाले. तसेच इंस्टाग्रामवर त्यांचे १० कोटी फॉलोअर्स असून, ते जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेत्यांपैकी एक आहेत.

Web Title : पीएम मोदी ने रचा इतिहास: सबसे लंबे समय तक नेता, अमित शाह ने की सराहना।

Web Summary : नरेंद्र मोदी भारत के सबसे लंबे समय तक सेवा करने वाले नेता बने। अमित शाह ने मोदी के समर्पण की सराहना की, विकास, वैश्विक मान्यता और 24+ वर्षों तक बिना ब्रेक सेवा पर प्रकाश डाला, जिससे जनता का समर्थन मिला।

Web Title : PM Modi sets record: Longest-serving leader, hailed by Amit Shah.

Web Summary : Narendra Modi surpasses record as India's longest-serving leader. Amit Shah lauded Modi's dedication, highlighting development, global recognition, and service without a break for 24+ years, earning public support.