शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

"दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं"; काश्मिरी नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 7:52 PM

बैठकीत मोदी म्हणाले, 'राजकीय मतभेद असतील. मात्र, राष्‍ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना फायदा होईल. जम्‍मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचे आहे.

नवी दिल्ला - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीरसंदर्भात काश्मिरी नेत्यांची बैठक बोलावली होती. जवळपास साडे तीन तास चाललेली ही बैठक सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास संपली. बैठकीत मोदी म्हणाले, 'राजकीय मतभेद असतील. मात्र, राष्‍ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना फायदा होईल. जम्‍मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचे आहे. एवढेच नाही, तर "दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं", असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. (PM Narendra Modi meeting with jammu kashmir's leaders on J&K article 370)

गुलाम नबी आझादांनी सरकारसमोर ठेवल्या अशा मागण्या- बैठकीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, या बैठकीत आम्ही काँग्रेसच्या वतीने सरकार समोर 5 मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत. पहिली मागणी होती, सरकारने राज्याचा दर्जा लवकरात लवकर बहाल करावा. ते म्हणाले, आम्ही काश्मिरी पंडितांना खोऱ्यात वसविण्यासंदर्भातही बोललो आहोत. केंद्र सरकारने लवकरात लवकर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्याव्यात, अशी मागणीही आम्ही केली आहे. अनुच्छेद 370 चे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असे यावेळी अधिकांश पक्ष म्हणाले. याच बरोबर, सरकार जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यास वचनबद्ध आहे, असे गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच सर्वच नेत्यांनी संपूर्ण राज्याची मागणी केली आहे, असेही आझाद यांनी यावेळी सांगितले. 

सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? काश्मिरी नेत्यांसोबतच्या बैठकीपूर्वी मोदींच्या घरी पोहोचले अमित शाह

पीडीपी नेते मुजफ्फर हुसैन बेग म्हणाले, अनुच्छेद 370 हटविण्याचा निर्णय जम्मू-काश्मीर विधानसभेच्या माद्यमाने व्हायला हवा, असे मी बैठकीत म्हटले आहे. मात्र, पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात स्पष्टपणे भाष्य केलेले नाही, असेही ते म्हणाले. 

महबुबा मुफ्तींनी उचलला अनुच्छेद 370 चा मुद्दा - बैठकीनंतर महबुबा मुफ्ती (पीडीपी अध्यक्ष) म्हणाल्या, बैठकीदरम्यान मी पंतप्रधानांना म्हणाले, की आपल्याला अनुच्छेद 370 हटवायचेच होते, तर आपण जम्मू-काश्मीरच्या विधानसभेला बोलवून ते हटवायला हवे होते. ते बेकायदेशीरपणे हविण्याचा कसलाही अधिकार नव्हता. अनुच्छेद 370 घटनात्मक आणि कायदेशीर मार्गाने बहाल करण्याची आमची इच्छा आहे. 

नरेंद्र मोदींच्या बैठकीपूर्वी निवडणूक आयोगाची जम्मू-काश्मीरमधील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

उमर अब्दुल्लांचं वक्तव्य -बैठकीनंतर उमर अब्दुल्ला म्हणाले, आम्ही बैठकीत म्हणालो, की 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने अनुच्छेत 370 हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करणार नाही. आम्ही न्यायालयाच्या माध्यमाने 370 च्या मुद्द्यावर आमचा लढा लढू.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले आर्टिकल 370 हटविल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी केंद्र सरकारकडून राज्यातील नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी काश्मिरी नेते फारूक अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझाद, रविन्द्र रैना, कवींद्र गुप्ता, निर्मल सिंह, सज्जाद लोन, भीम सिंह यांच्यासह इतरही काही नेते उपस्थित होते. याशिवाय, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, NSA अजीत डोवाल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, तसेच केंद्रातील काही अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीर