शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

Mann Ki Baat : खरेदीसाठी जाताना "व्होकल फॉर लोकल"चा संकल्प लक्षात ठेवा, पंतप्रधानांचं देशवासीयांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 12:05 PM

Mann Ki Baat Narendra Modi : सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना "व्होकल फॉर लोकल"चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा असं आवाहन मोदींनी देशवासीयांना केलं आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "मन की बात" कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला आहे. विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना "व्होकल फॉर लोकल"चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा असं आवाहन मोदींनी देशवासीयांना केलं आहे.

"जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारात कधी जायचं? नेमकी काय काय खरेदी करायची. विशेषत: लहान मुलांमध्ये याबाबत मोठा उत्साह असतो. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरा करत आहात. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत. त्यात आपला विजय देखील निश्चित आहे असंही यावेळी मोदी म्हणाले. 

वाईट प्रवृत्तींवर मिळवलेला विजय म्हणून दसरा साजरा केला जातो. सत्याचा असत्यावर विजय म्हणून आपण दसरा साजरा करतो, असं मोदी म्हणाले. लवकरच सणासुदीला सुरुवात होईल. कोरोनाचं संकट असल्यानं सण संयमानं साजरे करा आणि वस्तूंची खरेदी करताना देशात तयार झालेल्या उत्पादनांना प्राधान्य द्या. लोकलसाठी व्होकल व्हा, असं आवाहन मोदींनी केलं. सणासुदीआधी, सणासुदीच्या दिवसांत लोक खरेदी करतात. त्यावेळी स्थानिक आणि स्वदेशी वस्तू खरेदी करा, असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी जवानांनाही विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या सुरक्षेसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सीमेवर उभ्या असलेल्या जवानांसाठी आपण यंदाच्या दिवाळीत एक दिवा लावू, असं आवाहन त्यांनी केलं. सणासुदीच्या दिवसांत फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करा, असंही मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना दसरा आणि महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महानवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या या पावन दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा-आरती करण्यात येते. माता सिद्धीदात्रीच्या आशीर्वादाने प्रत्येकाला आपल्या कार्यात सिद्धी प्राप्त होईल, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनात कोविंद यांनीही देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दसऱ्याचा हे पर्व अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक आहे. आनंद आणि उत्साहाचा हा उत्सव, महामारीच्या प्रभावापासून सर्वांचं रक्षण करुन देशवासीयांना समृद्धी आणि आनंदी करेल, असे ट्विट कोविंद यांनी केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतMan ki Baatमन की बातcorona virusकोरोना वायरस बातम्या