शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'खोटं बोलणारे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ​​​​​​​ठेवतायेत'; मोदींचा कृषी विधेयकांवरून विरोधकांवर हल्लाबोल

By ravalnath.patil | Updated: September 25, 2020 13:47 IST

यूपीए सरकारने शेतकऱ्यांना फक्त २० लाख कोटींचे कर्ज दिले होते, मात्र, आमच्या सरकारने ३५ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

ठळक मुद्देकृषी विधेयकांचा सर्वाधिक फायदा लहान शेतकर्‍यांना होईल.

नवी दिल्ली : भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी कोरोना संकट काळात भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांची सेवा केली. काहींना कोरोनाची लागण झाली तर काहींनी आपला जीवही गमावला, असे सांगत नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा कृषी विधेयकांवरून विरोधकांवर निशाणा साधला.

गेल्या काही दिवसांत आपल्या सरकारने तरुण व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. लोकांच्या आयुष्यात सरकार जितके कमी हस्तक्षेप करेल तेवढे चांगले होईल. स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे शेतकऱ्यांच्या नावे अनेक घोषणा करण्यात आल्या. पण त्यांच्या घोषणा पोकळ राहिल्या, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

कृषी विधेयकांचा सर्वाधिक फायदा लहान शेतकर्‍यांना होईल.आता शेतकर्‍याची इच्छा आहे की, ते कोठेही धान्य विकू शकतील, जिथे शेतमालाला जास्त भाव मिळेल तेथे ते विकतील. यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सोप्या भाषेत शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. जे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलले, ते आता त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालत आहेत. हे लोक खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवत आहेत, असे म्हणत नरेंद्र मोदींना विरोधकांवर हल्लाबोल केला.

याचबरोबर, काही लोकांनी राष्ट्रहिताऐवजी स्वतःचे हित सर्वोच्च ठेवले आहे. शेतकर्‍यांना कायद्यात अडकवून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे धान्य कोठेही विक्री करता आले नाही. आम्ही MSP मध्ये रेकॉर्ड वाढविला. आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यूपीए सरकारने शेतकऱ्यांना फक्त २० लाख कोटींचे कर्ज दिले होते, मात्र, आमच्या सरकारने ३५ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

दरम्यान, मोदी सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. संसदेत या कृषी विधेयकांना विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएमधील काही घटक पक्षांनी विरोध दर्शविला. तरीही ही कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यामुळे कृषी विधेयकांतून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे.

या 'भारत बंद'मध्ये अनेक शेतकरी संघटनांसह काँग्रेस, आरजेडी, समाजवादी पार्टी, अकाली दल, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. तसेच, या कृषी विधेयकांविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरु केले आहे. तर महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनेही 'भारत बंद'ला पाठिंबा देण्यात आला असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.

आणखी बातम्या..

- गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी होते, पण भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे, गृहमंत्र्यांची खोचक टीका    

- रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध    

- अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ     

Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग

-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी