मोदी शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याची 'ती' बातमी FAKE; नोबेल समिती सदस्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 11:05 AM2023-03-17T11:05:28+5:302023-03-17T11:06:40+5:30

पाहा तोजे यांनी काय दिलं स्पष्टीकरण

pm narendra Modi is a strong contender for Peace nobel Prize news is FAKE Disclosure of Nobel committee member | मोदी शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याची 'ती' बातमी FAKE; नोबेल समिती सदस्याचा खुलासा

मोदी शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असल्याची 'ती' बातमी FAKE; नोबेल समिती सदस्याचा खुलासा

googlenewsNext

रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नाचं नोबेल पारितोषिक समितीने कौतुक केलं आहे. नोबेल समितीचे सदस्य अस्ले तोजे (Asle Toje) यांनी मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात असं वक्तव्य केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. परंतु ते खोटं असल्याचं स्पष्टीकरण हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर त्यांनी दिलंय.

दरम्यान, या बातम्या प्रसारित झाल्यानंतर तोजे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला एक मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. “एका बनावट बातमीचं ट्वीट समोर आलं होतं. त्या सर्व बातम्यांना आपण बनावट मानलं पाहिजे. ते खोटं वृत्त आहे आणि त्यावर आपण चर्चा करायला नको. त्यावर चर्चा करून त्याला हवा पाणी द्यायला नको. त्या ट्विट्समध्ये जे काही नमूद केलेलं ते वक्तव्य माझं नव्हतं. त्या विधानाचं मी स्पष्टपणे खंडन करतो,” असं तोजे यांनी म्हटलं.

तोजे नेमकं काय म्हणालेले?
“भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धाबाबत समज दिली, ते कौतुकास्पद आहे. त्यांनी धमकी/दबाव न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल संदेश दिला, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशा नेत्यांची गरज आहे,असं ते म्हणाले होते. तोजे हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारत एक महासत्ता बनणार हे निश्चित आहे, असं म्हटलं. 

Web Title: pm narendra Modi is a strong contender for Peace nobel Prize news is FAKE Disclosure of Nobel committee member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.