PM Narendra Modi Interview: मध्यमवर्गासाठी विचार बदलावा लागला...पाहा पंतप्रधान मोदी असे का म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 18:53 IST2019-01-01T18:42:29+5:302019-01-01T18:53:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला पहिलीच मुलाखत दिली.

PM Narendra Modi Interview: मध्यमवर्गासाठी विचार बदलावा लागला...पाहा पंतप्रधान मोदी असे का म्हणाले...
नवी दिल्ली : मध्यमवर्ग हा असा भारताचा भाग आहे, जो कोणाच्याही उपकारांवर जगत नाही. त्याचे देशाच्या विकासासाठी योगदान मोठे असते. यामुळे आम्हाला त्याच्यासाठी विचार बदलावे लागले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालयांच्या जागा वाढविल्या. याचा थेट फायदा मध्यमवर्गाला झाला. मुद्रा योजनेतून फायदा मिळाला. मध्यमवर्गीयांसाठी घर घेण्यासाठी 6 लाख रुपयांचे कर्जावरील व्याज माफ केले. यामुळे त्यांचे पैसे वाचले. कर्जासाठी त्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागत होते. एलईडी बल्ब, उज्ज्वला योजना यासारख्या योजना त्यांच्यासाठीच आल्या आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
''भाजपा फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहा चालवत नाहीत!'' https://t.co/gLTVeoQvmS@narendramodi@PMOIndia#BJP@AmitShah
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 1, 2019
आयकर भरण्यासाठीही आम्ही करामध्ये सूट दिली. 10 टक्क्यांवरून 5 टक्के कर केला. जीएसटीमुळे वस्तूंचे दर कमी झाले. याचा फायदा मध्यमवर्गालाच झाला आहे, असेही मोदी यांनी सांगितले.
PM Narendra Modi Interview: एका युद्धानं पाकिस्तान हा सुधारणारा देश नाही- मोदी https://t.co/ob4Z5NBxcg#narendramodi#pakistan
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 1, 2019