शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशसह 5 राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली; PM मोदींचे सर्व मंत्र्यांना खास निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 11:59 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर सर्वच मंत्रालये रोजच्या रोज बैठका घेत आहेत. विशेषतः उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कामांवर अधिक भर दिला जात आहे.

नवी दिल्ली - पुढील वर्षात उत्तर प्रदेश आणि पंजाबसह एकूण पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. निवडणुका होणार असलेल्या सर्व राज्यांतील प्रस्तावित कामांना मंत्र्यांनी प्राधान्य द्यावे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. (PM Narendra Modi instructions to ministers work on priority basis in electoral states)

या पाच राज्यांत होणार आहेत निवडणुका -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर सर्वच मंत्रालये रोजच्या रोज बैठका घेत आहेत. विशेषतः उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कामांवर अधिक भर दिला जात आहे. याच बरोबर विकास कामांसंदर्भात याद्याही तयार केल्या जात आहेत. पुढील वर्षात, देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत.

उत्तर प्रदेशात पुन्हा भाजप? -या पाचही राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच एबीपी सी-व्होटरने सर्व्हे केला होता. यानुसार, उत्तर प्रदेशात भाजपला 259 से 267 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय समाजवादी पक्षाला 109-117 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, बीएसपीला 12-16 जागा, काँग्रेसला 3-7 जागा आणि इतरांना 6-10 जागा मिळू शकतात.

Assembly election 2022: उत्तराखंडमध्ये BJPचा प्रयोग यशस्वी, योगींच्या कामावर जनता फिदा; पंजाबमध्ये काँग्रेसला फटका!

पंजाबमध्ये आपला मिळू शकतात 51 ते 57 जागा -या सर्वेक्षणानुसार, आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तसेच आम आदमी पक्षाला 51 ते 57 जागा मिळू शकतात. दुसरीकडे अकाली दलाला 16 ते 24 जागा मिळू शकतात. तर भाजपला केवळ 1 जागा मिळू शकते आणि इतरांनांही केवळ एकच जागा मिळू शकते.

अशी असेल गोवा आणि उत्तराखंडची स्थिती -सर्वेक्षणानुसार, उत्तराखंडमध्ये भाजपला 44 ते 48 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 19 ते 23 जागा, आम आदमी पार्टीला 0 ते 4 जागा आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजप पुन्हा एकदा सरकार बनवू शकते. येथे 22 ते 26 जागा भाजपच्या खात्यात येऊ शकतात. तर काँग्रेसला 3-7 जागा मिळू शकतात. याशिवाय, 4-8 जागा आम आदमी पक्षाला आणि 3-7 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. 

मणिपूरमध्ये भाजप आघाडीला 32 ते 36 जागा मिळण्याची शक्यता - या सर्वेक्षणानुसार, मणिपूरमध्ये काँग्रेसला 18 ते 22 जागा मिळू शकतात, तर भाजप आघाडीला 32 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. एनपीएफला केवळ 2 ते 6 जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतरांना 0 ते 4 जागा मिळू शकतात.  मणिपूरमध्ये भाजपला 40 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर 35 टक्के मते काँग्रेस, 6 टक्के एनपीएफ आणि 17 टक्के मते इतरांना मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाministerमंत्रीElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशPunjabपंजाबgoaगोवा