शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी भारताची तयारी सुरु : पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:05 PM

PM Narendra Modi : भारतातही लवकरच कोरोनाच्या लसीला मंजुरी देण्यात येणार असून जगातील सर्वात व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

ठळक मुद्देगुजरातच्या राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं.जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी तयारीही केली जात असल्याची पंतप्रधानांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातच्या राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी संबोधित करताना देशवासीयांना विश्वास देत लवकरच भारतातही कोरोनावरील लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचं म्हटलं. तसंच जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी तयारीही केली जात असल्याचे ते म्हणाले. तसंच आरोग्याच्या बाबतीत २०२० हे एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. २०२० मध्ये महासाथीच्या प्रादुर्भाव वाढण्याची चिंता होती. चहुबाजूंनी प्रश्न उपस्थित होत होते. परंतु २०२१ हे नवं वर्ष उपचाराची आशा घेऊन येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकसित केल्या जात असलेल्या लसीबाबत आवश्यक ती तयारी सुरू असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. "कोरोनाच्या लसीबाबत देशात आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतात विकसित होणारी लस ही जलदगतीनं सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवण्यासाठीही तयारी केली जात आहे. ज्या प्रकारे संक्रमण थांबवण्यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न केले तसं लसीकरणाची मोहिमही यशस्वी करण्यासाठी भारत एकत्र होऊन पुढे येईल," असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. "भारतानं एकजुट राहून वेळोवेळी आवश्यक ती पावलं उचलली. त्याचाच परिणाम म्हणून आज आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेत चांगली आहे. ज्या देशात १३० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या आहे त्या देशात १ कोटीपेक्षा अधिक लोकांनी या आजारावर मात केली आहे. भारत जेव्हा एकजुटीनं पुढे येतो तेव्हा संकट कितीही मोठं असेल त्याचा प्रभावीपणे सामना करू शकतो हे या वर्षानं दाखवून दिलं आहे," असंही मोदी यावेळी म्हणाले. "वर्षाचा हा अखेरचा दिवस लाखो डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, औषधांच्या दुकानांमध्ये काम करणारे आणि फ्रन्टलाईन वॉरिअर्सची आठवण करण्याचा आहे. कर्तव्य बजावत असताना ज्यांनी आपलं जीवनही याला समर्पित केलं त्यांना मी नमन करतो," असंही पंतप्रधान म्हणाले. निष्काळजीपणा नकोदेशात करोनाची लस येणार याचा अर्थ कोणी निष्काळजीपणा करावा असा होत नाही. आता औषध आणि काळजी या दोघांची सांगड घालत आपल्याला पुढे जावं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. "२०१४ च्या पूर्वी आपल्याकडे केवळ ६ एम्स रुग्णालयं तयार होती. ६ वर्षांत आम्ही १० एम्स रुग्णालयांवर काम सुरू केलं. एम्सच्या धर्तीवर सुपरस्पेशालिटी रुग्णालयांवरही काम सुरू आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य केंद्र स्थापन केली जात आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांना याचा फायदा मिळाला आहे. या योजनेमुळे गरीबांची ३० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम वाचली आहे. देशात ७ हजार जनऔषधी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी कमी दरात औषधं देण्यात येत आहेत," असंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAIIMS hospitalएम्स रुग्णालयGujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या