'चहा चांगलाय,पण थोडा गोड झाला';PM मोदी प्रोटोकॉल तोडून एका वसाहतीला भेट देतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 06:19 PM2023-12-30T18:19:51+5:302023-12-30T18:34:27+5:30

नरेंद्र मोदी अचानक पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले.

PM Narendra Modi during his Ayodhya visit visited the house of a Ujjwala beneficiary and had tea at her residence | 'चहा चांगलाय,पण थोडा गोड झाला';PM मोदी प्रोटोकॉल तोडून एका वसाहतीला भेट देतात तेव्हा...

'चहा चांगलाय,पण थोडा गोड झाला';PM मोदी प्रोटोकॉल तोडून एका वसाहतीला भेट देतात तेव्हा...

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रोड शो केल्यानंतर आणि अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केल्यानंतर अमृत भारत एक्स्प्रेस आणि वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. आपल्या व्यस्त वेळापत्रकात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही पूर्वनिर्धारित कार्यक्रमाशिवाय अयोध्येतील एका वसाहतीतीला देखील भेट दिली.

नरेंद्र मोदी अचानक पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी पोहोचले. नरेंद्र मोदींनी योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी चहापानही केले आणि त्यांच्याशी संवादही साधला. नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम अगोदर ठरलेला नव्हता. अशा परिस्थितीत प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक मीराच्या घरी आल्याने संपूर्ण कॉलनीतील लोक आश्चर्यचकित झाले. पंतप्रधानांचे आगमन होताच संपूर्ण परिसर 'मोदी-मोदी अन् जय श्री रामच्या' घोषणांनी दुमदुमून गेला. यावेळी नरेंद्र मोदींनी मीराने बनवलेला चहा प्यायला आणि चहा चांगला आहे, पण थोडा गोड झाला आहे असे सांगितले. यासोबतच नरेंद्र मोदींनी कुटुंबाची आणि संपूर्ण वसाहतीची विचारपूस केली.

नरेंद्र मोदींनी उज्ज्वला योजनेच्या फायद्यांबाबत माहिती घेतली. यावर मीराने नरेंद्र मोदींना सांगितले की, मला मोफत गॅस आणि राहण्याची सोय मिळाली आहे. ती म्हणाली, पूर्वी माझ्याकडे कच्चा घर होते पण आता ते कायम झाले आहे. ती म्हणाला की, तुम्ही घरी आल्याने मला खूप आनंद झाला आहे. यादरम्यान पीएम मोदींनी मीराच्या कुटुंबीयांशी १०-१५ मिनिटे चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदींनी एका मुलाला ऑटोग्राफही दिला. यामध्ये त्यांनी वंदे मातरम लिहिले आणि स्थानिक मुलांसोबत सेल्फीही काढला.

पाहा संपूर्ण व्हिडिओ-

Web Title: PM Narendra Modi during his Ayodhya visit visited the house of a Ujjwala beneficiary and had tea at her residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.