शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

PM Narendra Modi : 'काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण...' PM मोदींचा विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 14:55 IST

PM Narendra Modi : पीएम मोदी रविवारी कर्नाटक दौऱ्यावर आले, यावेळी त्यांनी हजारो कोटींच्या योजनांचे लोकार्पण केले. तसेच, काँग्रेसवर जोरदार टीकाही केली.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी(दि.12) कर्नाटकच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या वर्षातील त्यांचा हा सहावा राज्य दौरा आहे. रविवारी कर्नाटकात पोहोचल्यानंतर त्यांनी मांड्यात जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. 

'ते मोदीची कबर खोदण्यात अन् मोदी...'यावेळी पीएम मोदी म्हणाले की, 'काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहेत, पण मोदी बंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे बांधण्यात व्यस्त आहे. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात आणि मोदी गरिबांचे जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहेत. देशाच्या करोडो माता-भगिनींचे आशीर्वाद मोदींचे सर्वात मोठी सुरक्षा कवच आहे, हे मोदींची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणाऱ्या काँग्रेसवाल्यांना माहीत नाही.'

'काँग्रेसने देश लुटला'पीएम मोदी पुढे म्हणतात, '2014 पूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्या काळात त्यांनी गरीबाला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. गरिबांच्या विकासासाठी असलेला हजारो कोटींचा पैसा काँग्रेस सरकारने लुटला. काँग्रेसने गरिबांच्या दुःखाचा कधीच विचार नाही केला. उलट, शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या अडचणी दूर करुन भाजप त्यांचे प्रश्न सोडवत आहे. मांड्यातील 2.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरही पैसे पाठवण्यात आले आहेत,' असेही मोदी यावेळी म्हणाले.

'रिबांचे जीवन सुसह्य केले'आपल्या सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले, 'गेल्या 9 वर्षात भाजप सरकारच्या योजनांमुळे करोडो गरिबांचे जीवन सोपे झाले आहे. काँग्रेसच्या राजवटीत गरिबांना सुविधांसाठी सरकारच्या चकरा माराव्या लागत होत्या. आपल्या देशात अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्पही वेगाने पूर्ण जात आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने अप्पर भद्रा प्रकल्पासाठी 5,300 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. यामुळे कर्नाटकातील मोठ्या भागातील सिंचनाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत. आम्ही ठरवले आहे की, उसापासून बनवलेल्या इथेनॉलचे उत्पादन वाढवायचे आहे. म्हणजेच जास्त उत्पादन झाल्यास उसापासून इथेनॉल बनवले जाईल. इथेनॉलपासून शेतकऱ्याची चांगली कमाई होईल.'

'प्रेमाची परतफेड व्याजासह'मांड्याला पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वागत केले. मांड्यात मोदींचा मोठा रोड शो झाला. यावेळी लोकांची मोठी गर्दी दिसली आणि त्यांनी पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी करुन त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी येथे कोट्यवधी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली. पीएम मोदी म्हणाले की, आज म्हैसूर-कुशालनगर 4 लेन महामार्गाची पायाभरणीही झाली, हे सर्व प्रकल्प विकासाच्या मार्गाला नवी दिशा देतील. तुमच्या प्रेमाची व्याजासह परतफेड करण्याचा डबल इंजिन सरकारचा प्रयत्न असून, आज ज्या प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे, तो त्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसKarnatakकर्नाटकPoliticsराजकारण