शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

लक्ष्मण, द्रविडची कामगिरी विसरता येईल का?; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदींची बॅटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 8:39 PM

विद्यार्थ्यांच्या मनातली परीक्षेची भीती दूर करण्यासाठी पंतप्रधानांकडून मार्गदर्शन

नवी दिल्ली: विद्यार्थ्यांच्या मनात असलेली परीक्षेबद्दलची भीती दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्याशी संवाद साधला. परीक्षेतील गुण म्हणजे सर्व काही नाही. त्यामुळे परीक्षेला घाबरू नका. अपयश आयुष्याचा भाग आहे. त्यात घाबरण्यासारखं काहीच नाही, अशा शब्दांत मोदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणं देत परीक्षेचा तणाव घेऊ नका, असं आवाहन केलं. नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो, बिकट प्रसंगात संघर्ष करुन विजयी होता येतं, हे सांगताना मोदींनी क्रिकेटच्या मैदानातलं उदाहरण दिलं. २००१ मध्ये कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनं केलेल्या खेळीची आठवण मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितली. 'आपल्या संघाला त्यावेळी लागोपाठ धक्के बसत होते. परिस्थिती आव्हानात्मक होती. पण त्या परिस्थितीत द्रविड आणि लक्ष्मणनं केलेली कामगिरी कशी विसरता येईल? त्यांना संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं,' असं मोदी म्हणाले. अनिल कुंबळेनं दुखापत झालेली असतानाही केलेली गोलंदाजी विसरता येण्यासारखी नाही. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास अशा प्रकारे संघर्ष करता येतो, अशा शब्दांत मोदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आयुष्यात येणाऱ्या अपयशाला घाबरू नका, असं मोदी म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी चांद्रयान-२ मोहिमेचं उदाहरण दिलं. चांद्रयान मोहिमेदरम्यान मला इस्रोच्या कार्यालयात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण चांद्रयानचं लँडिंग यशस्वी होईल, याबद्दल कोणालाही खात्री नव्हती. पण तरीही मी तिथे गेलो, असं मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदींनी २०० विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी नव्या तंत्रज्ञानावर भाष्य केलं. नवं तंत्रज्ञान आत्मसात करा. पण त्याच्या आहारी जाऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. 'तंत्रज्ञानावर तुम्ही नियंत्रण ठेवा. ते तंत्रज्ञान तुमच्यावर नियंत्रण ठेवेल, इतका त्याचा वापर करू नका. तंत्रज्ञानामुळे तुमचा वेळ उगाच खर्च होणार नाही, याची काळजी घ्या,' असा सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. प्रत्येक घरात एक खोली तंत्रज्ञानमुक्त असायला हवी, असा विचार पंतप्रधानांनी मांडला. घरातली एक खोली गॅजेट्समुक्त असायला हवी, असं मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळायला हवेत, असं त्यांनी म्हटलं. 'दिवसातला कमीत कमी एक तास तंत्रज्ञानमुक्त असायला हवा. त्या वेळेत विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळायला हवं. विद्यार्थ्यांनी त्यांचा मोकळा वेळ ज्येष्ठांसोबत घालवायला हवा,' असं मोदींनी सांगितलं. अनेक पालक मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची सक्ती करतात. मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये गुंतवणं काही पालकांना प्रतिष्ठेचं वाटतं. अशा पालकांनी त्यांचा दृष्टीकोन बदलायला हवा, असं आवाहन मोदींनी केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Dravidराहूल द्रविड