'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:46 IST2025-08-31T14:43:33+5:302025-08-31T14:46:30+5:30
PM Narendra Modi China Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ शिखर परिषदेसाठी चीन दौऱ्यावर आहेत.

'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
PM Narendra Modi China Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. काँग्रेसने त्यांच्या या दौऱ्यावर बोचरी टीका केली आहे. 'पंतप्रधान मोदी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या सैनिकांना विसरले आणि हसत हसत चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी हस्तांदोलन केले,' अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी चीनला क्लीन चिट दिली: जयराम रमेश
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोदींवर कडक टीका केली. त्यांनी लिहिले की, 'आज पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात चीनच्या आक्रमकतेमुळे आपल्या २० शूर सैनिकांनी आपले प्राण गमावले. तरीही, १९ जून २०२० रोजी पंतप्रधान मोदींनी चीनला क्लीन चिट दिली.'
'लष्करप्रमुखांनी लडाखमध्ये चीनच्या सीमेवर स्थिती पूर्णपणे पूर्ववत करण्याची मागणी केली होती, परंतु हे साध्य करण्यात अपयशी ठरल्यानंतरही, मोदी सरकारने चीनशी समेट घडवून आणण्यासाठी पावले उचलली, ज्यामुळे त्या भागात चीनच्या आक्रमकतेला अप्रत्यक्षपणे वैधता मिळाली.'
आज प्रधानमंत्री मोदी और चीन के राष्ट्रपति शी जिनपिंग के बीच हुई मुलाकात का मूल्यांकन निम्नलिखित संदर्भों में किया जाना चाहिए -
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 31, 2025
जून 2020 में गलवान घाटी में चीनी आक्रामकता के चलते हमारे 20 सबसे बहादुर जवानों ने अपनी जान की क़ुर्बानी दी। इसके बावजूद, 19 जून 2020 को प्रधानमंत्री… pic.twitter.com/o9yGGcGllY
ऑपरेशन सिंदूरवर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला
रमेश पुढे म्हणाले की, '४ जुलै रोजी उपसेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानशी चीनच्या संगनमताबद्दल जोरदार आणि स्पष्टपणे बोलले. परंतु या अशुभ युतीला कडक प्रतिसाद देण्याऐवजी, मोदींनी आज चीनचा दौरा केला.'
चिनी प्रकल्पांमुळे भारताचे नुकसान
ते पुढे म्हणाले की, 'चीनने यारलुंग त्सांगपोवर एक मोठा जलविद्युत प्रकल्प जाहीर केला आहे, ज्याचे आपल्या ईशान्येकडील राज्यांवर खूप गंभीर परिणाम होतील. परंतु या मुद्द्यावर मोदी सरकारने एकही शब्द उच्चारला नाही. तसेच, चीनमधून आयातीचे अनियंत्रित डंपिंग सुरूच आहे, ज्यामुळे आपल्या एमएसएमई युनिट्सवर वाईट परिणाम झाला आहे. इतर देशांप्रमाणे कठोर उपाययोजना करण्याऐवजी, भारताने चिनी आयातदारांना जवळजवळ मोकळीक दिली आहे,' अशी टीका जयराम रमेश यांनी केली.
• चीन ने गलवान घाटी में हमारे 20 जांबाज सैनिकों की जान ले ली
— Congress (@INCIndia) August 31, 2025
• ऑपरेशन सिंदूर के वक्त चीन खुलकर पाकिस्तान का साथ दे रहा था
• चीन ने पाकिस्तान को लाइव अपडेट दिए
चीन की इन नापाक हरकतों पर नरेंद्र मोदी ने सख्त कदम उठाया. मुस्कराते हुए चीन के राष्ट्रपति से हाथ मिलाया. pic.twitter.com/fDquMqXwTi
काँग्रेसनेही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, 'चीनने गलवान खोऱ्यात आमच्या २० शूर सैनिकांचे प्राण घेतले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान चीन उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा देत होता. एवढेच नाही तर ते पाकिस्तानला लाईव्ह अपडेट्स देखील देत होते. तरीदेखील नरेंद्र मोदींनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी हसत हस्तांदोलन केले.'