"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 15:18 IST2025-11-02T15:17:08+5:302025-11-02T15:18:27+5:30
"निवडणूक संपली की, अदानी-अंबानी त्यांना नाचवतात."

"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
Bihar Assembly Election 2025 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेगूसराय येथील प्रचार सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली. त्यांनी पुन्हा एकदा म्हटले की, “मोदीजी निवडणूक जिंकण्यासाठी नाचायलाही तयार होतील. मोदींवर अदानी आणि अंबानी सारख्या लोकांचे नियंत्रण आहे.” यासोबतच त्यांनी पीएम मोदींच्या '56 इंच छाती'वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
56 इंच की छाती में कुछ नहीं रखा। 56 इंच की छाती वाले डरपोक हैं।
— Congress (@INCIndia) November 2, 2025
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
📍 बेगूसराय, बिहार pic.twitter.com/YibRxrJn16
56 इंच छाती असूनही अमेरिका पुढे झुकतात
राहुल गांधी म्हणाले, “इंग्रजांच्या काळात भारतीयांची 56 इंच छाती नव्हती, तरी त्यांनी ब्रिटिश साम्राज्याशी लढा दिला आणि विजय मिळवला. पण काही लोकांकडे 56 इंचाची छाती आहे, तरी ते अमेरिकेच्या पुढे झुकतात. 1971 मध्ये इंदिरा गांधींना अमेरिकेने धमकी दिली होती, परंतु त्या घाबरल्या नाहीत आणि त्यांनी जे करायचे होते ते केले. जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यास सांगितले, तेव्हा मोदींनी दोन दिवसांत ऑपरेशन थांबवले. सत्य हे आहे की, नरेंद्र मोदी ट्रम्पला घाबरतात."
नरेंद्र मोदी वोट के लिए स्टेज पर डांस भी कर देंगे।
— Congress (@INCIndia) November 2, 2025
चुनाव के दिन तक जो भी आप कहेंगे, नरेंद्र मोदी वो कर देंगे।
क्योंकि चुनाव के बाद वो सिर्फ अडानी-अंबानी के लिए काम करेंगे।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
📍 बेगूसराय, बिहार pic.twitter.com/fsyz0pfFBf
मोदी-शाह अदानी-अंबानींच्या नियंत्रणात
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर कॉर्पोरेट घराण्यांच्या दबावाखाली काम करण्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले, “मोदीजी निवडणुकीच्या वेळीच दिसतात, नंतर गायब होतात. निवडणुकीसाठी ते नाचायलाही तयार होतील, पण निवडणूक संपली की, अदानी-अंबानी त्यांना नाचवतात. देशाच्या धोरणांवर आता अदानी-अंबानींचा प्रभाव आहे. बिहारमधील सामान्य माणसाला जमीन मिळत नाही, पण अदानींना एक रुपयात जमीन दिली जाते. हे सरकार आता केवळ श्रीमंतांचे झाले आहे; गरीब आणि मध्यमवर्गीयांना मात्र संघर्ष करावा लागतो.”
1971 में इंदिरा गांधी जी को अमेरिका ने धमकी दी, लेकिन वे नहीं डरीं और जो करना था, वो करके दिखा दिया।
वहीं, जब अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप ने नरेंद्र मोदी से कहा- 'ऑपरेशन सिंदूर' बंद कर दो तो मोदी ने दो दिन में ऑपरेशन रोक दिया।
सच्चाई ये है कि नरेंद्र मोदी सिर्फ ट्रंप से ही नहीं… pic.twitter.com/VKCjA63xfD— Congress (@INCIndia) November 2, 2025
भाजप-RSS ने निवडूनक चोरली
"कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील संपूर्ण निवडणूक भाजप-आरएसएसने चोरली आहे. तर, निवडणूक आयोगाने बिहारमधील महाआघाडीच्या मतदारांना मतदार यादीतून काढून टाकले आहे. नरेंद्र मोदी रील्स का बनवण्यास सांगतात? कारण त्यांना तरुणांना हे समजावे असे वाटत नाही की, त्यांची अदानीशी भागीदारी आहे. ज्या दिवशी तरुणांना हे समजेल, त्या दिवशी नरेंद्र मोदी आणि अदानींचा व्यवसाय बंद होईल. खऱ्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर रील्स बनवण्यास सांगितले जाते," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.