Narendra Modi: आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार; ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 10:19 PM2021-12-25T22:19:00+5:302021-12-25T22:54:32+5:30

३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.

PM Narendra Modi announces vaccine for children, ‘booster’ for health staff and seniors citizen | Narendra Modi: आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार; ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार!

Narendra Modi: आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देणार; ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार!

googlenewsNext

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना सध्या सुरु असलेल्या नाताळ आणि वर्षअखेर या काळातही कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. जगभरात ओमायक्रोनचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे मास्कचा जास्तीत जास्त वापर करा, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. त्याचसोबत नरेंद्र मोदी यांनी आज तीन महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत.

३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोघटातील मुलाचं लसीकरण सुरु होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच १० जानेवारी २०२२ पासून आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील नागरिकांनाही बूस्टर डोस दिला जाऊ शकतो, पण यासाठी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.


दरम्यान, ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्शव्भूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याचे गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे.  भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे. 

Web Title: PM Narendra Modi announces vaccine for children, ‘booster’ for health staff and seniors citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.