"भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 12:10 PM2021-03-15T12:10:57+5:302021-03-15T12:14:08+5:30

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली प्रभू श्रीराम यांच्याशी

PM naremdra Modi will be worshipped as lord ram in future says uttarakhand new cm tirath singh rawat | "भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल"

"भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल"

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली प्रभू श्रीराम यांच्याशीउत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केली पंतप्रधानांची स्तुती

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी कोण? अशी चर्चा उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यानंतर अनेक नावांचीही चर्चा सुरू होती. परंतु चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत यांच्या हाती उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. दरम्यान, उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री रावत यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची तुलना प्रभू श्रीराम यांच्याशी केली आहे. रविवारी ऋषिकुल येथील सरकारी पीजी आयुर्वेदीक महाविद्यालयात आयोजित 'नेत्र कुंभ' या कार्यक्रमात ते बोलत होते. 

"आज अनेक देशांचे नेते पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी लाईनमध्ये उभे राहतात. यापूर्वीची स्थिती निराळी होती. जगातील कोणत्याच नेत्यांना आपल्या देशाच्या पंतप्रधानांशी फरकच पडत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आता स्थिती बदलली आह. हा एक नवा भारत आहे जो त्यांनी निर्माण केला आहे," असं रावत  म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. त्यांच्या भाषणादरम्यान मोदी जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. "यापूर्वीच्या काळात प्रभू श्रीराम यांनी समाजासाठी चांगलं काम केलं होतं आणि म्हणूनच लोकं त्यांना देव मानू लागले होते. याचप्रकारे भविष्यात आपल्या लाडक्या पंतप्रधानांसोबतही तसंच होईल," असंही त्यांनी नमूद केलं.

कोणत्याही उत्सवात जाण्यासाठी कोणत्या आरटी-पीसीआर रिपोर्ट किंवा यात्रेकरूंना नोंदणी करण्याची आवश्यकता असणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. परंतु सरकारनं घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. "कुंभ मेळ्याबाबात नकारात्मक अशी परिस्थिती आहे, परंतु आम्ही ती घालवली आह. लोकं या ठिकाणी कोणत्याही काळजीशिवाय येऊ शकतात. कोणालाही या ठिकाणी मज्जाव केला जाणार नाही," असंही रावत यांनी स्पष्ट केलं. 

नुकतीच घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

भाजप आमदारांच्या बैठकीत तीरथ सिंह रावत यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. रावत यांनी यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय सचिव, प्रदेशाध्यक्ष आणि शिक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे. १९८३ ते १९८८ दरम्यान ते संघाचे प्रचारक होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उत्तराखंडचे संघटन मंत्री म्हणूनही ते कार्यरत राहिले आहेत. उत्तराखंडचा मुख्यमंत्री होईन असा विचार कधी स्वप्नातही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया तीरथ सिंह रावत यांनी निवडीनंतर व्यक्त केली होती.

Web Title: PM naremdra Modi will be worshipped as lord ram in future says uttarakhand new cm tirath singh rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.