मेलोनी यांच्यासोबतच्या फोटोंवरून होणाऱ्या मीम्सबाबत पंतप्रधान मोदींचं मोठं विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 18:02 IST2025-01-10T18:02:06+5:302025-01-10T18:02:52+5:30
Narendra Modi & Giorgia Meloni: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांचे काही आंतरराष्ट्रीय परिषदांवेळचे फोटो सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. तसेच त्यांची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच त्यावरून मिम्सही तयार झाले होते. दरम्यान, निखिल कामत यांनी घेतलेल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदीं यांनी या फोटोंवर तयार झालेल्या मिम्सबाबत मोठं विधान केलं आहे.

मेलोनी यांच्यासोबतच्या फोटोंवरून होणाऱ्या मीम्सबाबत पंतप्रधान मोदींचं मोठं विधान, म्हणाले...
भारताचेपंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे जगातील अनेक देशांच्या प्रमुखांसोबत मैत्रिपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे या नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो हे अनेकदा व्हायरल होत असतात. दरम्यान, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांचे काही आंतरराष्ट्रीय परिषदांवेळचे फोटो सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. तसेच त्यांची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच त्यावरून मिम्सही तयार झाले होते. दरम्यान, निखिल कामत यांनी घेतलेल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदीं यांनी या फोटोंवर तयार झालेल्या मिम्सबाबत मोठं विधान केलं आहे.
या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदी यांच्या फोटोंवरून तयार होणाऱ्या मिम्स पाहता का? असे विचारले असता नरेंद्र मोदी म्हणाले की, अशा गोष्टी चालत राहतात. मी त्यामध्ये माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही, असे सांगितले.
यावेळी जगभरात भारताची प्रतिष्ठा कशी वाढली आहे, याचं उदाहरण देताना नरेंद्र मोदी यांनी सांगिते की, एखाद्या देशात आमचा राजदूत हा नंतर जातो. मात्र तिथे राहणारे भारतीय हे आमच्यासाठी राष्ट्रदूत आहेत. आम्ही त्यांना सोबत घेतलं आहे. त्यामुळे आमची ताकद ही कैकपटीने वाढली आहे. जगभरातील भारतीयांना एकत्र आणणं हे नीती आयोगाच्या उद्देशांमध्ये सर्वात मोठा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुलाखतीमध्ये निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना अनेक रोचक प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदींनीही या प्रश्नांना अतिशय धीटपणे उत्तरे दिली. पहिल्या टर्ममध्ये मी दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि लोक मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या टर्ममध्ये हे सगळं अधिक चांगले समजू लागले, असं पंतप्रधान मोगी म्हणाले. जगातील वाढत्या युद्धांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की आम्ही तटस्थ नाही आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असं पंतप्रधान म्हणाले.
राजकारणातील तरुणांच्या भूमिकेवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांनी महत्त्वाकांक्षेने नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे, असं म्हटलं. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. "चुका होतात, माझ्याकडूनही त्या झाल्या असतील. मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही," असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. तेव्हापासून मोदींच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.