"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:29 IST2025-05-27T16:28:13+5:302025-05-27T16:29:17+5:30

मोदी पुढे म्हणाले, "१९४७ मध्ये भारत मातेचे तुकडे झाले. खरे तर साखळदंड तुटायला हवे होते. मात्र, हात कापले गेले. देशाचे तीन तुकडे झाले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला...

PM Modi's big attack on Congress, mentioning Sardar Patel; spoke clearly in gujarat | "जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले

"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले

दहशतवाद ही पाकिस्तानची सुनियोजित युद्धनीती आहे. १९४७ मध्ये भारत मातेचे तुकडे झाले. खरे तर साखळदंड तुटायला हवे होते. मात्र, हात कापले गेले. देशाचे तीन तुकडे करण्यात आले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने मुजाहिदीनांच्या नावाखाली भारत मातेच्या एक भू-भागावर कब्जा केला. जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना कंठस्नान घातले असते... ते मुजाहिदीन, जे रक्त चाटून गेले होते, ती मालिका गेल्या ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगामध्येही त्याचेच विकृत रूप होते. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी गांधीनगर येथे जनतेला संबोधित करत होते.

मोदी पुढे म्हणाले, "सरदार पटेलांची इच्छा होती, जोवर पीओके परत येत नाही, तोवर आपले सैन्य थांबायला नको. मात्र, सरदार पटेलांचे म्हणणे ऐकले गेले नाही आणि ते मुजाहिदीन, जे रक्त चाटून गेले होते, ती मालिका गेल्या ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगामध्येही त्याचेच विकृत रूप होते. ७५ वर्षे आपण सोसले आहे आणि पाकिस्तान सोबत जेव्हा जेव्हा यद्धाची वेळ आली, तिनही वेळा भारताच्या सैन्य शक्तीने पाकिस्तानला धूळ चारली आणि पाकिस्तानला समजले की ते लढाईत भारतासोबत जिंकू शकत नाही. सैन्य प्रशिक्षित दहशतवादी भारतात पाठवले जातात आणि निर्दोश निशस्त्र लोक मारले जातात आणि आपण सहण करत राहिलो." 

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “६ मेच्या रात्री पाकिस्तानात जे मारले गेले, त्यांना स्टेट ऑनर देण्यात आला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले आणि तेथील सैन्याने त्यांना सलामीही दिली. यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी कारवाया हे प्रॉक्सी वॉर नाही, तर तुमची (पाकिस्तानची) सुनियोजित युद्धनीती आहे. जर तुम्ही युद्ध करत असाल, तर तुम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर मिळेल." 
 

Web Title: PM Modi's big attack on Congress, mentioning Sardar Patel; spoke clearly in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.