शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली; मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:52 PM

सॅम पित्रोडांच्या वादग्रस्त विधानांवर मोदींची जोरदार टीका

नवी दिल्ली: काँग्रेसच्या परदेश विभागाचे अध्यक्ष आणि गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांच्या वादग्रस्त विधानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पलटवार केला. पित्रोडांची विधानं अतिशय लज्जास्पद असून काँग्रेसनंपाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा सुरू करण्यास केली आहे, अशा शब्दांमध्ये मोदी बरसले आहेत. पुलवामा हल्ल्यामागे काहीजणांचा हात होता. त्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार धरायला नको, असं विधान पित्रोडा यांनी केलं. त्यावरुन मोदींनी पित्रोडा आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या सॅम पित्रोडा यांनी भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राइकवरदेखील प्रश्न उपस्थित केले. 'एअर स्ट्राइक झाला का? जर एअर स्ट्राइक झाला असेल, तर त्यात कितीजण मारले गेले? हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे,' असं पित्रोडा एका मुलाखतीत म्हणाले. यानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेस पक्षाच्या वतीनं गांधी कुटुंबाच्या सल्लागारांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाचं उद्घाटन केलं आहे, असं ट्विट करत पंतप्रधानांनी काँग्रेसवर तोंडसुख घेतलं. काँग्रेस देशाच्या सैन्यावर प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोप मोदींनी केला. 'काँग्रेस दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही, हे काँग्रेसच्या राजघराण्याशी प्रामाणिक असलेल्या व्यक्तीनं मान्य केलं आहे. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं हे काँग्रेसला माहीत नाही. मात्र हा नवा भारत आहे. आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देतो,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं. याआधी समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांनीही पुलवामा हल्ल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. गोपाल यांच्या विधानाचाही मोदींनी समाचार घेतला. विरोधकांना दहशतवादाचं समर्थन करण्याची आणि सुरक्षा दलांना प्रश्न विचारण्याची सवय झाली आहे, अशी टीका मोदींनी केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान