पंतप्रधान मोदींनी चहा विकलेली चहाची टपरी होणार पर्यटन स्थळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 15:32 IST2019-09-02T15:31:49+5:302019-09-02T15:32:53+5:30
प्रल्हाद पटेल यांनी शहरातील रेल्वे स्टेशनला देखील भेट दिली. येथील प्लॅटफॉर्मवर एक टपरी आहे. याच टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबीमुळे लहानपणी चहा विकला होता. खुद्द मोदींनी या टपरीचा अनेकदा उल्लेख केला आहे.

पंतप्रधान मोदींनी चहा विकलेली चहाची टपरी होणार पर्यटन स्थळ !
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणी ज्या ठिकाणी चहा विकला, तेथील चहाची टपरी आता पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याची योजना करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीकमंत्री प्रल्हाद पटेल नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर शहरात गेले होते. यावेळी त्यांनी येथील अशा काही ठिकाणांची यादी केली ज्या स्थळांचा आगामी काळात पर्यटनस्थळ म्हणून विकास करता येईल.
प्रल्हाद पटेल यांनी शहरातील रेल्वे स्टेशनला देखील भेट दिली. येथील प्लॅटफॉर्मवर एक टपरी आहे. याच टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबीमुळे लहानपणी चहा विकला होता. खुद्द मोदींनी या टपरीचा अनेकदा उल्लेख केला आहे.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर चहा विकण्याच्या मुद्दावरून टीका केली होती. ते म्हणाले होते की, २१व्या शतकात कधीही मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. परंतु, त्यांची इच्छा असेल तर ते एआयसीसीच्या अधिवेशनात चहा विकू शकतात. अय्यर यांचे हे वक्तव्य भाजपच्या जिव्हारी लागले होते. त्यानंतर भाजपने त्यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला होता. तसेच 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम आयोजित केला होता.
दरम्यान पर्यटनमंत्र्यांनी येथील मोदींनी चहा विकलेल्या टपरीची पाहणी केली. पत्र्याच्या या टपरीचा खालचा भाग गंज लागल्यामुळे खराब झाला आहे. ही टपरी वाचविण्यासाठी पटेल यांनी ही टपरी काचाने सुरक्षीत ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच टपरी आहे तशीच ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.