शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 2:05 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल' असं मोदी यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल' असं मोदी यांनी म्हटलं आहे. गुरुवारी पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'दीदींनी थप्पड लगावली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल' असं मोदी यांनी म्हटलं आहे. गुरुवारी (9 मे) पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

'मला सांगितलं गेलं की दीदींना मोदींना थप्पड मारायची आहे. ममता दीदी, मी तर तुम्हाला दीदी म्हणतो. तुमचा आदर करतो. तुम्ही थप्पड मारली तरी तो माझ्यासाठी आशीर्वाद असेल. तेही सहन करीन,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींवर खोचक टीका केली आहे. जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना 'मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते' असंही ममता यांनी म्हटलं होतं. पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. मोदी पश्चिम बंगालमध्ये आल्यानंतर म्हणतात, तृणमूल काँग्रेस गुंडांचा पक्ष आहे. त्याचवेळी मनात आले की, मोदींनी जोरदार चपराक ठेवून द्यावी. मोदींना त्याची गरज आहे. आजपर्यंत असा खोटारडा पंतप्रधान पाहिला नाही. निवडणुका आल्या की यांना राम आठवतो, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि नोटबंदी केली, अशी घणाघाती टीका ममता यांनी केली होती.

'वर्ड वॉर' : ममता म्हणाल्या, मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छालोकसभा निवडणुकीतील 'वर्ड वॉर' आणखीच पेटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शाब्दीक चकमक थांबायचे नाव घेत नाही. मी स्वत:ला विकून राजकारण करत नाही. आपण कुणालाही घाबरत नसून निडरतेने जगते. मोदी केवळ दंगे भडकवण्यात आग्रेसर आहेत. धर्माच्या नावावर जनतेत फूट पाडत असल्याची टीका देखील ममता यांनी मोदींवर केली होती. जय श्री राम हा भाजपचा नारा आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने हा नारा द्यावा. निवडणुका आल्यावर प्रभू रामचंद्र भाजपाचे आणि नरेंद्र मोदींचे एजंट होतात, का असा सवालही ममता यांनी उपस्थित केला होता.

दुश्मनी जमकर करो, लेकिन... सुषमा स्वराज यांचं ममता बॅनर्जींना प्रत्युत्तर

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीका केली जाऊ लागली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या टीकेनंतर केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मोदी हे दुर्योधन आणि रावणाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते' असं ममता यांनी म्हटलं होतं. त्याला सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'ममता जी, आज तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत. 'तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी जी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच जुळवून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला बशीर बद्र यांच्या एका शायरीची आठवण करून देते - दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों' असं ट्वीट स्वराज यांनी केलं आहे. तसेच ममता यांना शेर ऐकवत त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019