नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणीबाणीवरुन काँग्रेसवर हल्ले चढवत असताना आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी महिलांच्या सुरक्षेवरुन मोदींवर तोफ डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अंगणात व्यायाम करण्यात मग्न आहेत आणि महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत देशाची अवस्था अफगाणिस्तान, सीरिया आणि सौदी अरेबियापेक्षा वाईट झाली आहे, असं ट्विट करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. महिला सुरक्षेच्याबाबत भारताची स्थिती जगात सर्वात वाईट असल्याचं थॉमसन रॉयटर्सच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याच सर्वेक्षण अहवालावरुन राहुल गांधींनी मोदींना लक्ष्य केलं. 'आमचे पंतप्रधान त्यांच्या अंगणात पायांच्या बोटांवर उभे राहतात. मात्र ते महिला सुरक्षेचा विषय टाळतात. बलात्कार आणि महिलांच्या सुरक्षेबाबत भारताची अवस्था अफगाणिस्तान, सीरिया आणि सौदी अरेबिया यांच्यापेक्षाही वाईट आहे. यामुळे देशाला लाज आणली आहे,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
देशाला लाज आणली; महिला सुरक्षेवरुन राहुल गांधींचा मोदींवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 18:05 IST