पीएम नरेंद्र मोदी मला मोठ्या भावासारखे; सीएम रेवंत रेड्डींकडून पंतप्रधानांचे तोंडभरुन कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 22:12 IST2024-03-04T22:11:11+5:302024-03-04T22:12:13+5:30
'गुजरातप्रमाणे तेलंगणाचा विकास करायचा आहे, त्यासाठी आम्हाला मोदींची मदत लागेल.'

पीएम नरेंद्र मोदी मला मोठ्या भावासारखे; सीएम रेवंत रेड्डींकडून पंतप्रधानांचे तोंडभरुन कौतुक
PM Modi is Like an Elder Brother: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी तेलंगणा राज्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी राज्याला हजारो कोटी रुपयांची प्रकल्पांची भेट दिली आहे. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री रेवंत रेड्डीदेखील उपस्थित होते. रेड्डींनी पंतप्रधानांचे 'मोठे भाऊ' असे वर्णन केले आणि तेलंगणाचा विकास करायचा असेल तर 'गुजरात मॉडेल'चे अनुसरण करावे लागेल, असेही म्हटले.
रेवंत रेड्डी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यांसाठी ‘मोठ्या भावासारखे’ आहेत. आम्हाला केंद्राशी संघर्ष न करता गुजरातच्या धर्तीवर तेलंगणाचा विकास करायचा आहे आणि यासाठी आम्हाला केंद्र सरकारची गरज लागेल. तेलंगणाची राजधानी हैदराबाद हे देशातील पाचवे मोठे शहर आहे. देशाचे पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी तेलंगणा पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहे. हैदराबाद आणि तेलंगणा देशाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
అభివృద్ధి కోసం వేదికలు పంచుకుంటాం…
— Revanth Reddy (@revanth_anumula) March 4, 2024
సంక్షేమంలో సమన్వయంతో పని చేస్తాం…
సమాఖ్య స్ఫూర్తిని గౌరవించడమే మా సిద్ధాంతం.
రాష్ట్రం విషయంలో రాజీపడబోం…
ఆత్మగౌరవం విషయంలో తలెత్తుకునే ఉంటాం.#TelanganaPrajaPrabhutwam#PrajaPalanapic.twitter.com/ZUf0s523lq
रेड्डी पुढे म्हणतात, केंद्र आणि राज्यांमध्ये संघर्ष झाला की शेवटी जनतेलाच त्रास सहन करावा लागतो. राजकारण केवळ निवडणुकीपुरते मर्यादित ठेवावे आणि निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नेत्यांनी केंद्राच्या मदतीने राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करावा. काही मुद्द्यांवर मंजुरी घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली, तेव्हा पंतप्रधान मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
अनेक दिवसांनी मुख्यमंत्री-पंतप्रधान एकाच मंचावर
विशेष म्हणजे, बऱ्याच दिवसांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री पीएम मोदींसोबत एकाच व्यासपीठावर आले आहेत. यापूर्वी बीआरएस सुप्रीमो आणि माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अनेकवेळा पंतप्रधान मोदींच्या राज्यातील अधिकृत दौऱ्यांमध्ये अनुपस्थित राहिले होते. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधानांसोबत स्टेज शेअर करुन एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.