शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार, थोडी लाज बाळगा', PM मोदींची नितीश कुमारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:58 IST

Narendra Modi Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महिलांच्या लैंगिक शिक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

Narendra Modi Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसंख्या नियंत्रणावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मध्य प्रदेशमध्ये एका सभेला संबोधित करताना पीएम नरेंद्र मोदी, यांनीही नितीश कुमारांच्या लैंगिक शिक्षणावरील वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. 

संबंधित बातमी- नितीश कुमार 'कंट्रोल' तर आता RJD 'अनकंट्रोल', BJP ला घेरण्यासाठी केले अतिशय टोकाचे ट्विट

'india आघाडीचे नेते गप्प'मध्य प्रदेशातील गुना येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पीएम म्हणाले की, 'विधानसभेत देशातील महिलांवर अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या नितीशकुमारांना लाज वाटली पाहिजे. अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात? नितीश कुमारांमुळे जगात देशाचे नाव खराब झाले. त्यांनी विधानसभेत देशातील माता-भगिनींचा अपमान केला. या मुद्द्यावर विरोधी आघाडीचे नेते गप्प का आहेत?' असा सवाल मोदींनी यावेळी विचारला.

 

'काँग्रेस काहीच करू शकत नाही'आपल्या भाषणात पीएम मोदींनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत म्हटले की, 'जे लोक स्त्रियांबद्दल असा विचार करतात, ते तुमच्यासाठी काहीच चांगले काम करू शकत नाहीत. माता-भगिनींच्या अशा भयंकर अपमानावर इंडिया आघाडीचा एकही नेता चकार शब्द बोलायला तयार नाही. भविष्याचा विचार करण्याची काँग्रेसमध्ये क्षमता नाही. ते आजच्या तरुणांसाठी किंवा भावी पिढ्यांसाठी काहीही करू शकत नाही.' 

संबंधित बातमी- "मी तर केवळ महिला शिक्षणासंदर्भात..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी जाहीर माफी मागितली!

'काँग्रेसला खोटं बोलण्याची सवय''काँग्रेससाठी देश आणि राज्याचा विकास महत्त्वाचा नाही, तर काँग्रेससाठी केवळ स्वतःचे हित महत्त्वाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली, पण गरिबी हटावचा नारा देत काँग्रेस गेली अनेक वर्षे तेच-तेच खोटं देशाला वारंवार सांगत आहे. काँग्रेसला गरिबी कधीच हटवता आली नाही, कारण काँग्रेस नेत्यांचे हेतू योग्य नव्हते. तिसर्‍यांदा माझा कार्यकाळ सुरू होईल, तेव्हा या देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या 3 मध्ये आणेन, हा मोदीचा शब्द आहे,' असंही मोदी यावेळी म्हणाले. 

'काँग्रेसचे नेते रिमोटवर चालतात'यावेळी मोदींनी काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली. '2014 पूर्वी देशाने काँग्रेसला 10 वर्षे संधी दिली होती. पण देशाचे पंतप्रधान काय करत आहेत. हे कोणालाच कळत नव्हते. कारण सर्व काही रिमोटने चालवले जात होते. आजही काँग्रेस रिमोट वापरण्याची सवय सोडत नाही. तेव्हा पंतप्रधान रिमोटवर काम करायचे, आता काँग्रेस अध्यक्ष रिमोटवर काम करतात. काँग्रेस अध्यक्ष हे सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, पण ते केवळ नाममात्र आहेत. कधी ते सनातन धर्मावर बोलतात तर कधी विरोधात बोलतात, हे सगळं रिमोटवर चालतं,' अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाElectionनिवडणूकPoliticsराजकारण