नितीश कुमार 'कंट्रोल' तर आता RJD 'अनकंट्रोल', BJP ला घेरण्यासाठी केले अतिशय टोकाचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 02:25 PM2023-11-08T14:25:23+5:302023-11-08T14:26:48+5:30

Bihar CM Nitish Kumar: नितीश कुमारांनी माफी मागितली, पण आता आरजेडीने नवा वाद सुरू केला आहे.

Bihar CM Nitish Kumar: bihar-rjd-is-uncontrolled-gave-reaction-and-target-bjp-after-nitish-kumar-video | नितीश कुमार 'कंट्रोल' तर आता RJD 'अनकंट्रोल', BJP ला घेरण्यासाठी केले अतिशय टोकाचे ट्विट

नितीश कुमार 'कंट्रोल' तर आता RJD 'अनकंट्रोल', BJP ला घेरण्यासाठी केले अतिशय टोकाचे ट्विट

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसंख्या नियंत्रणावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. वाद वाढल्यानंतर त्यांनी जाहीर माफीही मागितली. एकीकडे नितीश कुमार प्रकरण 'कंट्रोल' करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांचा पक्ष RJD भाजपला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात 'अनकंट्रोल' झाला आहे.

नितीश कुमार यांच्या बचावासाठी आरजेडीने बुधवारी (08 नोव्हेंबर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भाजपला कोंडीत पकडण्यासाठी एक पोस्ट केली. यामध्ये आरजेडीने मणिपूरमधील घटनेचा उल्लेख केला. याशिवाय काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील जंतरमंतरवर आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी केलेल्या निदर्शनाचीही आठवण करुन दिली आणि पोस्टमध्ये अतिशय टोकाची टीका केली.

राजदच्या पोस्टमुळे नवा वाद 
आरजेडीने ही पोस्ट टाकून प्रकरण पुन्हा वाढवले ​​आहे. भाजपचे प्रवक्ते प्रभाकर मिश्रा म्हणाले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी सभागृहात ज्या प्रकारे महिलांचा अपमान केला आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला कलंक लावला, त्यावरुन हा राजदच्या संगतीचा परिणाम असल्याचे दिसते. आजही राष्ट्रीय जनता दलाने एक्सवर जे काही लिहिले, त्यावरून स्पष्ट होते की आरजेडीच्या नेत्यांच्या नजरेत महिलांना आदर नाही. हे लोक महिलांना चैनीच्या वस्तू मानतात, म्हणूनच ते अशी विधाने करत आहेत.

दरम्यान, राजद आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आरजेडीचे प्रवक्ते शक्ती यादव म्हणाले की, आमच्या पक्षाने जे पोस्ट केले आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. मोदी सरकारच्या काळात जे झाले, तेच आम्ही लिहिले आहे. तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमारांच्या वक्तव्याचे समर्थन केले. भाजपनेही तेजस्वींच्या वक्तव्याला विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Web Title: Bihar CM Nitish Kumar: bihar-rjd-is-uncontrolled-gave-reaction-and-target-bjp-after-nitish-kumar-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.