शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशभरात १५०० ऑक्सिजन प्लांट उभारा; तिसऱ्या लाटेचा धोका पाहता पंतप्रधानांचे सज्जतेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:10 IST

Coronavirus Third Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात जाणवला होता ऑक्सिजनचा तुडवडा. तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून तयारी सुरू. 

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात जाणवला होता ऑक्सिजनचा तुडवडा.तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून तयारी सुरू. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडाही जाणवला होता. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं तयारी सुरू केली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूबाबतच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये १५०० ऑक्सिजन प्लान्ट्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसंच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावं असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. याशिवाय ऑक्सिजन प्लांट्सची देखरेख आणि त्यांच्या कामाबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावरही मोदींनी भर दिला.

दरम्यान, या ऑक्सिजन प्लांट्ससाठी निधी पंतप्रधान मदत निधीमधून दिला जाणार आहे. तसंच यामुळे देशात ४ लाख ऑक्सिजन बेड्स उभारण्यासही मदत मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी काही लोकं असली पाहिजे ज्यांना ऑक्सिजन प्लांट्सची देखभाल आणि त्याच्या कामकाजाबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल, असंही मोदी बैठकीदरम्यान म्हणाले. सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी दुसऱ्या लाटेदरम्यान हाहाकार माजला होता. याशिवाय सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून खबरदारी घेतली जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड्सची कमतरता जाणवली होती. राज्यांसह काम करादुसऱ्या लाटेदरम्यान सरकारच्या कामाकाजावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. परंतु आता खरबदारी म्हणून सरकारनं उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. तसंच लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीदरम्यान केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारांसोबत मिळून काम करण्यास सांगितलं आहे. याशिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही योग्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनIndiaभारतprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी