माध्यमांच्या 'त्या' प्रश्नांपासून सावध राहा; मोदींचा नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:09 PM2019-10-22T17:09:49+5:302019-10-22T17:11:11+5:30

मोदींच्या भेटीनंतर अभिजीत बॅनर्जींची पत्रकारांना सावध उत्तरं

Pm Modi Cautioned me About Media Trapping For Anit Modi Comments says Nobel Laureate Abhijit Banerjee | माध्यमांच्या 'त्या' प्रश्नांपासून सावध राहा; मोदींचा नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींना सल्ला

माध्यमांच्या 'त्या' प्रश्नांपासून सावध राहा; मोदींचा नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींना सल्ला

Next

नवी दिल्ली: नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर भाष्य करणारे अभिजीत बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर माध्यमांच्या प्रश्नांना सावधपणे उत्तरं देताना दिसले. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर अभिजीत बॅनर्जींनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला लक्षवेधी उत्तर दिलं. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी टाकलेल्या जाळ्यात अडकू नका, असं मोदींनी भेटीदरम्यान सांगितल्याचं बॅनर्जींनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 

मोदींची भेट घेतल्यानंतर अभिजीत बॅनर्जींनी पत्रकारांशी संवाद साधला. 'मोदींसोबतची भेट उत्तम होती. मोदींनी संवादाची सुरुवात एका विनोदानं केली. मला (अभिजीत यांना) मोदीविरोधी विधानं करण्यासाठी माध्यमांकडून कसं भरीस पाडलं जाईल, हे पंतप्रधानांनी भेटीच्या सुरुवातीलाच सांगितलं,' असं बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाले. 'पंतप्रधान टीव्ही पाहतात. त्यांची सगळ्या गोष्टींवर नजर आहे. ते प्रसारमाध्यमांवरही लक्ष ठेवून आहेत. तुम्ही (प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी) काय करण्याचा प्रयत्न आहात, यावर मोदींची नजर आहे,' असं बॅनर्जींनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 



नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यावर अभिजीत बॅनर्जींनी भारतीय अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत असल्याचं म्हटलं होतं. या विधानानंतर झालेल्या मोदींच्या भेटीबद्दल भाष्य करताना माध्यमांना माझ्या तोंडून काय ऐकायचं आहे, याची मला कल्पना असल्याचं अभिजीत बॅनर्जी म्हणाले. भारतातल्या बँकिंग क्षेत्रावर मोठं संकट असून परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असं बॅनर्जींनी म्हटलं होतं. भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत असून त्यामधून बाहेर पडण्यासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. 

Web Title: Pm Modi Cautioned me About Media Trapping For Anit Modi Comments says Nobel Laureate Abhijit Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.