पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:19 IST2025-08-02T14:18:35+5:302025-08-02T14:19:43+5:30

PM Kisan Sanman Yojana 20th Installment: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. 

PM Kisan Sanman Yojana 20th installment amount deposited in farmers' accounts, check status | पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस

पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. 

पीएम किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम कधी जमा होणार याबाबत वेगवेगळ्या तारखा समोर येत होत्या. दरम्यान, आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वाराणसी या लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे २० हजार ५०० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. ही रक्कम जमा केल्याचा संदेश लाभार्थी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला आहे.

पीएम किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याची रक्कम या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर योग्य आणि अपडेटेड माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात  आली आहे,  

लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही, असं तपासा
-सुरुवातीला PM Kisan योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- तेथील  Farmer Corner मध्ये जाऊन Beneficiary Status वर क्लिक करा.  
 -त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाईप करा
- सर्व माहिती भरल्यानंतर Get Report वर क्लिक करून आपला स्टेटस चेक करा 

Web Title: PM Kisan Sanman Yojana 20th installment amount deposited in farmers' accounts, check status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.