PM Kisan Samman Nidhi Yojana: खूशखबर! पीएम किसानच्या 4000 रुपयांसोबत आणखी तीन फायदे मिळण्याची शक्यता, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 01:22 PM2021-11-17T13:22:22+5:302021-11-17T13:22:44+5:30

PM Kisan Samman Nidhi Yojana: शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे खात्यात टाकले जाणार आहेत. ही रक्कम केंद्र सरकार दुप्पट करण्याचा विचार करत आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana: Farmers is likely to get three more benefits with Rs 4000, find out | PM Kisan Samman Nidhi Yojana: खूशखबर! पीएम किसानच्या 4000 रुपयांसोबत आणखी तीन फायदे मिळण्याची शक्यता, जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi Yojana: खूशखबर! पीएम किसानच्या 4000 रुपयांसोबत आणखी तीन फायदे मिळण्याची शक्यता, जाणून घ्या

googlenewsNext

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. शेतकरी दहाव्या हप्त्याची वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला दहाव्या हप्त्याचे पैसे खात्यात टाकले जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांना देत असलेली रक्कम दुप्पट करण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना 2000 ऐवजी 4000 रुपये मिळू शकतात.

लवकरच 10 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. पण, याचबरोबर मोदी सरकार आणखी तीन फायदे देण्याची तयारी करत आहे. 

किसान क्रेडिट कार्ड (KCC kisan credit card)
आता किसान क्रेडिट कार्ड देखील पीएम किसान योजनेशी जोडले गेले आहे. केसीसी बनवण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी म्हणून हे करण्यात आले आहे. म्हणजेच सरकार ज्याला 6000 रुपये देत आहे, त्यांना KCC बनवणे सोपे होणार आहे. सध्या सुमारे 7 कोटी शेतकऱ्यांकडे KCC आहे, तर सरकारला आणखी एक कोटी लोकांना लवकरात लवकर समाविष्ट करायचे आहे आणि त्यांना 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे.

पीएम किसान मानधन योजना
जर एखादा शेतकरी पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीत. कारण अशा शेतकऱ्याची संपूर्ण कागदपत्रे भारत सरकारकडे आहेत. या योजनेअंतर्गत, शेतकरी पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकतात. त्यामुळे त्याला थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याच्या प्रीमियममधून 6000 रुपये कापले जातील.

किसान कार्ड बनवण्याची योजना
मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या डेटावर आधारित शेतकऱ्यांसाठी युनिक फार्मर आयडी (Unique farmer ID) तयार करण्याच्या तयारीत आहे. हे ओळखपत्र पीएम किसान आणि राज्यांच्या भूमी अभिलेख डेटाबेसशी लिंक करून बनवण्याची योजना आहे. यानंतर शेतीशी संबंधित योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सोपे होणार आहे.

संबंधीत बातम्या...

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे 6000 रुपये पती-पत्नीला मिळू शकतात का? जाणून घ्या कोण कोण पात्र, अपात्र...

PM Kisan Samman Nidhi Refund List: 'या' शेतकऱ्यांना पीएम किसानचे सर्व हप्ते परत करावे लागणार; यादीत तुमचे नाव तपासा...

Web Title: PM Kisan Samman Nidhi Yojana: Farmers is likely to get three more benefits with Rs 4000, find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.