PM Kisan Samman Nidhi: ऑक्टोबरपर्यंत करा हे काम, डिसेंबरच्या हप्त्यात होईल चार हजार रुपयांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 09:58 AM2021-10-19T09:58:44+5:302021-10-19T10:14:35+5:30

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांजवळ ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी करण्याची संधी आहे. जर तुम्ही ३१ ऑक्टोबरपूर्वी आपली नोंदणी केली तर तुम्हाला ४ हजार मिळू शकतील.

PM Kisan Samman Nidhi: Do this work by October, you will get a benefit of four thousand rupees in December installment | PM Kisan Samman Nidhi: ऑक्टोबरपर्यंत करा हे काम, डिसेंबरच्या हप्त्यात होईल चार हजार रुपयांचा फायदा

PM Kisan Samman Nidhi: ऑक्टोबरपर्यंत करा हे काम, डिसेंबरच्या हप्त्यात होईल चार हजार रुपयांचा फायदा

Next

नवी दिल्ली - प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) दहावा हप्ता १५ डिसेंबर २०२१ पर्यंत येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या वेळच्या हप्त्यामध्ये रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार रुपयांऐवजी चार हजार रुपये पाठवले जाणार आहे. मात्र मोदी सरकारने याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही. याचा फायदा उचलण्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधींतर्गत नोंदणी करावी लागेल.

शेतकऱ्यांजवळ ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी करण्याची संधी आहे. जर तुम्ही ३१ ऑक्टोबरपूर्वी आपली नोंदणी केली तर तुम्हाला ४ हजार मिळू शकतील. आतापर्यंत नोंदणी करू न शकलेल्या लाभार्थ्यांना दोन हप्त्यांचा लाभ दिला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अर्ज केला आणि तो स्वीकारला गेला तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार रुपये आणि डिसेंबर महिन्यात दोन हजार रुपये मिळतील. अशा प्रकारे चार हजार रुपये थेट तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येतील.

पीएम योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये पाठवले जातात. सरकार ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा करते. हा पैसा थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जातो. या योजनेला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत १२ कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच आतापर्यंत १.६० लाख कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे.  

या योजनेसाठी अशी करा घरबसल्या नोंदणी 
- आपल्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून PMKISAN GoI Mobile App डाऊनलोड करा
- त्यानंतर हे अॅप ओपन करा आणि NEW FARMER REGISTRATION वर क्लिक करा
- तुमचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड योग्य पद्धतीने नोंद करा. त्यानंतर Continue बटणावर क्लिक करा
- आता नोंदणी फॉर्ममध्ये नाव, पत्ता, बँक अकाऊंट डिटेल, आयएफएससी कोड इत्यादी योग्य पद्धतीने नोंद करा.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. त्याबरोबरच पीएम किसान मोबाईल अॅपवर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
- कुठल्याही प्रकारच्या नोंदणीसाठी शेतकरी, पीएम किसान हेल्पलाईन नंबर 155261 / 011-24300606 चा वापर करू शकतो. 

Web Title: PM Kisan Samman Nidhi: Do this work by October, you will get a benefit of four thousand rupees in December installment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.