शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
6
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
7
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
8
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
9
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
10
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
11
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
12
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
13
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
15
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
16
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

'देशाचे जवान शहीद होताना मोदी व्यायामात मग्न'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 7:00 PM

पंतप्रधान फिट, देश अनफिट असल्याची समाजवादी पक्षाची टीका

नवी दिल्ली: लष्कराचे जवान औरंगजेब आणि ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणखी वाढली आहे. काश्मीरमध्ये जवान, संपादकांची हत्या होत असताना पंतप्रधान मोदी मात्र व्यायामात मग्न आहेत, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली. 'देशाचे जवान शहीद होत आहेत. पत्रकार, मजूर, विद्यार्थी मारले जात आहेत. मात्र मोदींसाठी तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची आहे. एकीकडे जवान शहीद होताना दुसरीकडे पंतप्रधान व्यायाम करत आहेत. पंतप्रधान फिट, देश अनफिट,' अशा शब्दांमध्ये आझम खान मोदींवर बरसले. काल लष्कराचे जवान औरंगजेब यांची हत्या करण्यात आली होती. रात्री त्यांचा मृतदेह लष्कराच्या हाती लागला. तर रात्री आठच्या सुमारास रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली. 

काल रात्री शुजात बुखारी यांच्यावर लाल चौकात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. बुखारी गाडीत बसत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बुखारी गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुखारी यांच्या हत्येचा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी