शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या टेहळणी प्रकरणाची चौकशी करा

By admin | Updated: July 29, 2014 01:59 IST

केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचे वृत्त कपोलकल्पित असल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न

शीलेश शर्मा, नवी दिल्लीकेंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी पाळत ठेवणारी उपकरणे आढळल्याचे वृत्त कपोलकल्पित असल्याचे सांगून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न चालवले असले तरी काँग्रेससह विरोधी पक्ष मात्र याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत़ बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होताच, या मुद्यावरून दोन्ही सभागृहांत गोंधळ होण्याची चिन्हे आहेत़उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरींच्या टेहळणीच्या मुद्यावर मोदींवर थेट हल्ला करणे आणि यानिमित्ताने मोदींचे महिला हेरगिरीचे प्रकरण पुन्हा जिवंत करणे, अशी काँग्रेसची योजना आहे़ एरवी मितभाषी म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही गडकरींच्या टेहळणीप्रकरणाच्या चौकशी मागणी केली असल्याने काँग्रेस याप्रकरणी शांत बसणार नाही, हे स्पष्ट झाले आहे़आज सोमवारी काँग्रेसने तसे संकेत देत याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली़ सरकारने मात्र ही मागणी एकप्रकारे धुडकावून लावली़ नवी दिल्लीतील ३-मूर्ती मार्गावरील गडकरींच्या निवासस्थानातील शयनकक्षात आवाज रेकॉर्ड करणारी अत्युच्च दर्जाची उपकरणे सापडल्याचे वृत्त काल रविवारी मीडियाने दिले होते़ ही उपकरणे परदेशी असल्याने व भारतात त्यांचा कुठेच वापर होत नसल्याने याप्रकरणातील गांभीर्य वाढले होते़ या पार्श्वभूमीवर खुद्द गडकरींनी आज सोमवारी नव्याने खुलासा करीत, माझ्या घरात कुठलेही रेकॉर्डर वा टेहळणी करणारी उपकरणे सापडली नसल्याचे स्पष्ट केले़ यासंदर्भातील वृत्त पूर्णत: कपोलकल्पित असल्याचे त्यांनी म्हटले़ दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि त्यांचे राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी या मुद्यात पडण्यास नकार दिला़ सरकार या प्रकरणाची चौकशी करणार का? या प्रश्नाला उत्तर देणे राजनाथसिंह यांनी टाळले़ गडकरींनी स्वत: अशी कुठलीही उपकरणे सापडल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे़ अशास्थितीत माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही, असे ते म्हणाले़ खुद्द गडकरी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या खुलाशाऊपरही काँग्रेसने हे प्रकरण लावून धरले असून याप्रकरणाच्या चौकशीची मागणी पुढे रेटली आहे़ हे एक गंभीर प्रकरण असल्यामुळे याची चौकशी व्हावी, असे काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंह म्हणाले़ हे प्रकरण भारतीय मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या सुरक्षेशी निगडित आहे़ मंत्रिमंडळातील एका मंत्र्याबाबत असे घडत असेल तर परमेश्वरच देशाला वाचवेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़शक्तीसिंह गोहिल यांनी या मुद्यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली़ गुजरातेत मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा हेरगिरी सर्वसामान्य बाब होती़ मोदी दिल्लीत आले आणि आता दिल्लीतही हेरगिरी सुरू झाली़ हेरगिरी करणे ही मोदींची जुनीच पद्धत आहे़ कारण ते कुणावरही विश्वास ठेवत नाहीत़ हेरगिरीबाबत त्यांनी आपल्या महिला मित्रासही सोडले नाही़ त्यामुळेच या प्रकरणी सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले़ माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनीही चौकशीची मागणी केली़ सरकारने अशाप्रकारच्या घटनांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी उपलब्ध कायदेशीर पर्यायांबाबत जनतेला माहिती द्यायला हवी, असे काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी याप्रकरणी सरकारने संसदेत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली़ गडकरींच्या घरी टेहळणी उपकरणे सापडण्याच्या वृत्ताबाबत सरकारने संसदेत निवेदन द्यावे तसेच यामागे पीएमओ वा विदेशी शक्ती यापैकी कुणाचा हात आहे तेही सांगावे, असे ते म्हणाले़