शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात धर्तीवर कचरा उचलण्याचे नियोजन हवे पारंपरिक पद्धतीवर भर: स्मार्ट नियोजनाची आहे गरज

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

सोलापूर : शहरातील कचरा उचलण्यासाठी पारंपरिक पद्धतीवरच भर दिला जात आहे. आता सोलापूरची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाल्याने गुजरातच्या धर्तीवर कचर्‍याचे विल्हेवाट लावण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.

सोलापूर : शहरातील कचरा उचलण्यासाठी पारंपरिक पद्धतीवरच भर दिला जात आहे. आता सोलापूरची स्मार्ट सिटी योजनेसाठी निवड झाल्याने गुजरातच्या धर्तीवर कचर्‍याचे विल्हेवाट लावण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.
लोकमतने सोलापुरातील कचर्‍याच्या समस्येकडे मालिकेद्वारे लक्ष वेधल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरची ओळख होण्यासाठी अगोदर कचर्‍याची विल्हेवाट होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी मांडले आहे. यात नागरिकांचाही सहभाग मोठा आहे. नागरिकांची स्वयंशिस्त व आरोग्य विभागाचे सूक्ष्म नियोजन यांची सांगड घातल्याशिवाय शहर स्वच्छ होणार नाही. उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी कचर्‍याच्या विल्हेवाटसाठी नागरिकांकडून कचरा खरेदीचा प्रस्ताव मांडला आहे. कचरा गोळा करण्यासाठी गुजरातमधील सुरत महापालिकेने राबविलेल्या यंत्रणेचा मॉडेल म्हणून उपयोग करता येईल. घंटागाड्यांचे नियोजन, गोळा केलेला कचरा वजन करून थेट डंपरमध्ये घालण्यासाठी विभागनुसार खास डंपिंग स्टेशन स्थापन केले आहेत. यामुळे घंटागाड्यांचा कमी प्रवास, जास्त वजन वाहनक्षमता वाढते. कचर्‍याच्या वजनात गडबडी होत नाहीत व न सांडता कचर्‍याची वाहतूक होते.
शहरात कुंड्यात टाकलेला कचरा मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर येतो. तसेच भरलेले कंटेनर वेळेवर उचलले जात नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. गेल्या सहा महिन्यात वेगाने वाहणारे वारे व वेळेत कचरा न उचलल्याने सर्वत्र प्लास्टिक पिशव्या, कापड, कागद विखुरल्याने सौंदर्याला बाधा आली आहे. आरोग्य विभाग कचरा उचलण्यासाठी पूर्वीपासून प्रचलित असलेल्या यंत्रणेचा वापर करीत आहे. ज्या ठेकेदारांना काम दिले आहे, ते ठेकेदार सफाई मजुरांना साहित्य पुरवित नसल्याचे दिसून येते. फावडे किंवा हातानेच कचरा भरला जातो, अन्यथा आता थेट जेसीबीचा वापर सुरू झाला आहे. यापेक्षा वेगळी अत्याधुनिक यंत्रणा ताफ्यात दाखल होणे गरजेचे झाले आहे.
इन्फो..
आयुक्त झाले अस्वस्थ
कचर्‍याच्या समस्येमुळे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील हे अस्वस्थ झाले आहेत. बुधवारी त्यांनी याबाबत काय काय उपाययोजना राबविता येतील, यावर विचारविनिमय केला. भोगाव येथील कचरा डेपोशेजारी कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पास महापालिका ओला कचरा पुरविते, पण अलीकडे कचरा उचलण्याची यंत्रणा ढेपाळल्याने कंपनीने स्वत:ची यंत्रणा उभारून हॉटेल व मंडईतील कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीने शहरातील कचरा उचलण्याबाबत सर्वेक्षण करावे, अशी सूचना आयुक्तांनी संचालकांना केली आहे.