११० प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले, काही सेकंदातच क्रॅश झाले; कझाकिस्तान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:33 IST2024-12-25T15:27:29+5:302024-12-25T15:33:04+5:30

कझाकिस्तानमध्ये आज विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Plane carrying 110 passengers takes off, crashes within seconds Shocking video of Kazakhstan accident emerges | ११० प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले, काही सेकंदातच क्रॅश झाले; कझाकिस्तान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला

११० प्रवाशांना घेऊन विमानाने उड्डाण केले, काही सेकंदातच क्रॅश झाले; कझाकिस्तान अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला

कझाकस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ एक प्रवासी विमान कोसळले. विमानात ११० प्रवासी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील काही लोक बचावले आहेत. दरम्यान, या अपघाताशी संबंधित एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे, या व्हिडीओत संपूर्ण घटना कैद झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच विमान अचानक वेगाने जमिनीच्या दिशेने येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही सेकंदांनंतर विमान कोसळते. व्हिडिओंमध्ये स्फोटाचा आवाजही ऐकू येतो. स्फोटानंतर आगीचे लोट आणि धुराचे लोट हवेत उठताना दिसत आहेत.

करौलीत कार आणि बसची भीषण धडक, अपघातात इंदूरच्या ५ जणांचा मृत्यू; १५ हून अधिक जखमी

हे विमान अझरबैजान एअरलाइन्सद्वारे चालवले जात असल्याचे सांगितले. चेचन्या, रशियातील बाकू येथून ते ग्रोझनी येथे निघाले होते, पण ग्रोझनीमध्ये धुक्यामुळे त्याचा मार्ग बदलण्यात आला.

विमान अपघातानंतर बचाव करतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विमानाचा मागील भाग दिसत आहे, तर पुढचा भाग खराब झाला आहे. मदतकार्यात गुंतलेले काही लोक तुटलेल्या विमानातून वाचलेल्या प्रवाशांना बाहेर काढतानाही दिसत आहेत. व्हिडिओमध्ये अपघाताच्या तासाभरानंतरही विमानाच्या काही भागातून धूर निघताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने दुपारी २ वाजता एक निवेदन जारी केले की, अझरबैजान एअरलाइन्सच्या अपघातात ४२ लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्याचबरोबर या विमानात बसलेल्या प्रवाशांचीही माहिती समोर आली आहे. विमानात अझरबैजानचे ३७, रशियाचे १६, कझाकिस्तानचे ६ आणि किर्गिस्तानचे ३ प्रवासी होते.

Web Title: Plane carrying 110 passengers takes off, crashes within seconds Shocking video of Kazakhstan accident emerges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.