भारत-अमेरिका व्यापार करारातून भारताला काय मिळणार? पीयूष गोयल यांनी दिली महत्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 18:59 IST2026-02-03T18:48:39+5:302026-02-03T18:59:26+5:30
Piyush Goyal on India-America Trade Deal: 'या व्यापार करारात कृषी आणि डेअरी क्षेत्राला पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. '

भारत-अमेरिका व्यापार करारातून भारताला काय मिळणार? पीयूष गोयल यांनी दिली महत्वाची माहिती
Piyush Goyal on India-America Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतिक्षित व्यापार करारावर आज अखेर शिक्कामोर्तब झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मंगळवारी या कराराची औपचारिक घोषणा केली असून, त्यांनी या कराराला भारताच्या उज्ज्वल भविष्याला चालना देणारा ऐतिहासिक टप्पा म्हटले आहे. या कराराअंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात कर 50 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यामुळे चीन, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि बांगलादेशसारख्या प्रादेशिक निर्यात प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत भारताला मोठी आघाडी मिळणार आहे.
एक बड़ा मजबूत, भारत के भविष्य को चार चांद लगाने वाला #IndiaUSTradeDeal माननीय प्रधानमंत्री @NarendraModi जी के नेतृत्व में कल रात finalise किया गया है।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 3, 2026
भारत के 140 करोड़ नागरिकों को, हर गरीब, किसान, मछुआरा, गांव में रहने वाला युवा-युवती, हमारी बहनें, महिलाएं सभी के लिए ढेर सारे… pic.twitter.com/lk5joUwjsW
महीन्यांच्या चर्चेनंतर करार अंतिम
पीयूष गोयल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अंतिम करण्यात आलेली ही डील आपल्या शेजारी देशांच्या तुलनेत भारतासाठी सर्वाधिक फायदेशीर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आमची टीम सातत्याने चर्चा करत होती. अनेक गुंतागुंतीचे विषय आणि अडचणी होत्या. भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आले होते, ज्याचा सर्वांनाच फटका बसत होता. मात्र, मैत्रीच्या आधारावर आणि राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत पंतप्रधानांनी ही उत्तम डील मिळवून दिली.
कृषी आणि डेअरी क्षेत्र सुरक्षित
गोयल यांनी स्पष्ट केले की, या व्यापार करारात कृषी आणि डेअरी क्षेत्राला पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जपले असून, या डीलमध्येही तेच दिसते. हा करार भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करेल आणि नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण करेल. हा करार दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील व्यापार आणि विकासातील सहकार्याचा नवा अध्याय सुरू करतो. यामुळे मॅन्युफॅक्चरिंगला चालना, रोजगारनिर्मिती आणि ‘विकसित भारत’च्या दिशेने वेग वाढेल, असेही गोयल म्हणाले.
इस #IndiaUSTradeDeal से हमारे सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्योग, हमारे engineering सेक्टर के सभी players, हमारे textiles क्षेत्र, हमारा gems & jewellery सेक्टर, हमारा leather and footwear सेक्टर, marine सेक्टर, सभी को ढेर सारे अवसर मिलेंगे। pic.twitter.com/bxVttOaQP2
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 3, 2026
MSME, टेक्सटाइल, ज्वेलरीला संधी
गोयल यांनी सांगितले की, या डीलमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) मोठ्या संधी मिळतील. टेक्सटाइल, ज्वेलरी, मरीन गुड्ससारख्या क्षेत्रांना थेट फायदा होईल. आता छोटे व्यापारीही अमेरिकन बाजारात आपली उत्पादने विकू शकतील.
तेल आयातीत बदल
या करारात रशियाकडून तेल खरेदीवर लावण्यात आलेला 25 टक्के दंडात्मक टॅरिफही हटवण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिका व व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी वाढवेल, तसेच रशियाकडून आयात कमी करेल, असेही गोयल यांनी स्पष्ट केले.
बड़ा दुर्भाग्य है कि राहुल गांधी जी जैसे नकारात्मक सोच रखने वाले नेता देश को गुमराह करने की कोशिश कर रहे हैं।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) February 3, 2026
उनको देश की तरक्की से कोई लेना-देना नहीं है। मुझे नहीं लगता भारत का एक भी नागरिक उनकी इस भ्रमित सोच के साथ अपने आपको जोड़ सकता है। pic.twitter.com/vL1gtBM7lz
राहुल गांधींवर गोयल यांची टीका
या घोषणेनंतर पीयूष गोयल यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. संसदेत चर्चा करायची आमची तयारी होती, पण विरोधकांनी, विशेषतः राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली, अत्यंत लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे संसदेत बोलण्याऐवजी आम्हाला बाहेर येऊन माहिती द्यावी लागली. राहुल गांधी खोटे पसरवत आहेत आणि देशाला दिशाभूल करत आहेत. नकारात्मक राजकारण करून भारताच्या प्रगतीला रोखण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी टीका गोयल यांनी केली.