धक्कादायक! ज्या श्वानाला मुलासारखं वाढवलं, खाऊ घातलं; त्यानेच घेतला महिलेचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 14:25 IST2022-07-13T14:25:31+5:302022-07-13T14:25:41+5:30
Lucknow Pitbull Attack: जेव्हा पाळीव श्वानाने तिच्यावर हल्ला केला तेव्हा ती घरात एकटीच होती. जेव्हा महिलेचा मुलगा घरी पोहोचला तेव्हा त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

धक्कादायक! ज्या श्वानाला मुलासारखं वाढवलं, खाऊ घातलं; त्यानेच घेतला महिलेचा जीव
Lucknow Pitbull Attack: पाळीव प्राण्यांमध्ये श्वानाला सर्वात इमानदार मानलं जातं. पण यूपीची राजधानी लखनौमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका रिटायर्ड महिला शिक्षिकेचा जीव तिच्याच पाळीव पिट बूल डॉगने घेतला. जेव्हा पाळीव श्वानाने तिच्यावर हल्ला केला तेव्हा ती घरात एकटीच होती. जेव्हा महिलेचा मुलगा घरी पोहोचला तेव्हा त्याला आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथेच तिने अखेरचा श्वास घेतला.
घरात होते दोन श्वान
पोलिसांनुसार, सावित्री नावाची रिडायर्ड महिला टीचर आपल्या घरात 25 वर्षीय मुलासोबत राहत होती. तिचा मुलगा जिम ट्रेनर आहे. त्याच्याकडे दोन पाळीव श्वान आहेत. एक पिट बुक आणि एक लॅब्राडॉग. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांनी श्वानाचा भुंकण्याचा आणि सावित्री यांचा आवाज ऐकला होता.
शेजारी म्हणाले की, 'जेव्हा आम्ही महिलेचा मदतीसाठी आवाज ऐकला. तेव्हा आम्ही त्यांच्या दरवाज्यात गेलो. पण दरवाजा आतून बंद होता आणि काकी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आम्ही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तो बंद होता. आम्ही लगेच त्यांच्या मुलाला सूचना दिली'.
जेव्हा मुलगा घरी परत आला तेव्हा तो शेजाऱ्यांच्या मदतीने आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांना महिलेच्या गळ्यावर, पोटावर आणि पायांवर खोल जखमा दिसल्या. मृत महिलेच्या शरीरात श्वानाच्या दातांचे घाव दिसले. पोटाचं मांस फाटलं होतं.
डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांनी त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केले. पण जास्त रक्त वाहून गेल्याने महिलेला वाचवता आलं नाही. रात्री उशीरा मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात एकच भितीचं वातावरण आहे. स्थानिक लोकांनी सांगितलं की, दोन्ही श्वान गेल्या तीन वर्षांपासून परिवारासोबत आहेत. त्यांना असं कधीच बघितलं नव्हतं. अजून समजू शकलेलं नाही की, श्वानांची जीवघेणा हल्ला का केला.